Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : MPSC पेपर फुटी प्रकरणी 6 जणांना अटक

Marathi Breaking Live Headlines Updates : 4 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यासह राज्यभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

MPSC पेपर फुटी प्रकरणी 6 जणांना अटक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून यापैकी ३ जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात मॅन होम क्लीन करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल शिंदे (वय 20) आणि मनोज शिंदे (वय 26) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नावजवळपास एक वर्षांपूर्वी याच मॅन हॉलमध्ये देखील बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मॅन होल क्लीन करत असताना देखील झाला होता दुर्दैवी मृत्यू

गणेशोत्सवातच तापणार गोकुळचे राजकारण, 4 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

गोकुळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून ऐन गणेशोत्सवातच या निवडणुकीचे वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे. येत्या 4 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने दहा सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावरील बोगदा आज १ तास बंद राहणार

समृद्धी महामार्गावरील नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगदा १ तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत बोगदा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT