Live-Update-2 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : दरोडेखोरांकडून ‘समृद्धी’वर लूट; 11 ते 12 जणांच्या टोळीने 27.8 तोळे दागिने लांबविले

Political Breaking Live Headlines Updates : कुणबी आणि जात पडताळणीत नाकारलेली प्रकरण मंजुरीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून जालना अंतरवली सराटी येथील बेमुदत उपोषण आंदोलनासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.....

सरकारनामा ब्युरो

Nashik : दरोडेखोरांकडून ‘समृद्धी’वर लूट; 11 ते 12 जणांच्या टोळीने 27.8 तोळे दागिने लांबविले

समृद्धी महामार्गावर नाशिकच्या मलढोण शिवारात वाहने पंक्चर करून प्रवाशांना मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली. 11 ते 12 जणांच्या टोळीने एका वाहनातील प्रवाशांकडील तब्बल 27.8 तोळे दागिने आणि 84 हजार 500 रुपये रोख असा एकूण 18 लाख नऊ हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. दुसऱ्या वाहनातील प्रवाशांनाही दांडक्याने मारहाण करण्यात आली. दरम्यान, तिसरे वाहन अडविल्यानंतर त्यातील एका प्रवाशाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोर पळून गेल्याची चर्चा आहे. मात्र, याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून बेमुदत उपोषण आंदोलनाला बसणार

मराठा आरक्षणातील 58 लाख नोदींच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या जुन्या मागणीसह जात पडताळणीत नाकारलेली प्रमाणपत्रेही द्यावीत, या मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून बेमुदत उपोषण आंदोलनाला बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT