Live-Update-2 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस; मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा

Political Breaking Live Headlines Updates : दहिहंडी उत्सव आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...

सरकारनामा ब्युरो

Manoj Jarange Andolan : बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस; मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून, जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. 11 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा मुंबईच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये एमडी ड्रग्ससह युवकाला; अटक चार दिवसांची पोलिस कोठडी

संगमनेरमध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर बसस्थानक परिसरात छापा मारून पोलिसांनी 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा 'एमडी' ( मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा आणि दुचाकी असा एकूण 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कासिफ कुरेशी नामक 25 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Konkan Crime : कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. कुडाळ नगरपंचायतीमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे 1200 रुपये किमतीची खड्यासह चांदीची अंगठी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नाटेकर याने तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कारवाईपूर्वी संशय आल्याने त्याने अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत विभागाने सांगितले.

MPSC Pepar Leak : पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांचा हात असल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

एमपीएससीच्या MPSC परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या वक्तव्याविरोधात आता किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदारांचा पेपरफुटीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हे आरोप निराधार असल्याचा दावा करत संबंधित व्यक्तीविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Satara News : रेशन दुकानदारांच्या विविध अडचणीसंदर्भात सोमवारी ‘पॉज मशिन बंद - धान्य वाटप बंद’ आंदोलन

रेशन दुकानदारांना येणाऱ्या विविध अडचणी व प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभर रेशन दुकानदारांच्या राज्य संघटनेच्या वतीने येत्या सोमवारी (ता. सात) ‘पॉज मशिन बंद - धान्य वाटप बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. सर्व दुकानदारांनी या लाक्षणिक आंदोलनात सहभागी होऊन राज्य, केंद्र शासनास संघटनेची एकजूट दाखवावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Konkan News : समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे गणपतीपुळे किनारा बंद

समुद्रातील धोकादायक स्थिती कायम असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा गुरुवारपासून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या आदेशानंतर पुन्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. दहा दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार, हा किनारा खुला करण्यात आला होता.

Jalgaon Crime : मुलाच्या खुनात आईवडील आणि भावाचा सहभाग उघड

जळगावच्या मोहाडी येथे मागील महिन्यात राधेशाम हरचंद राठोड (वय 26 याने दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, तपासात ही आत्महत्या नसून आईवडील आणि भावानेच संगनमत करून मद्यपी तरुणाचा खून केल्याचे उघड झाले. राधेशामच्या दारूचे व्यसनाला व त्रासाला कुटुंब पूर्णपणे कंटाळले होते.

Amravati Crime : अमरावती शहर चौकात मुलीची हत्या करणाऱ्याला आरोपीस अटक

अमरावती शहरात रवीनगर चौकात अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची हत्या केल्यानंतर पसार झालेल्या संशयित युवकाने कुटुंबीयांना दूरध्वनी करून मुलीला चाकू मारल्याची माहिती दिल्याची बाब उघड झाली आहे. संशयित युवकास राजापेठ पोलिसांनी गोंदिया येथून अटक करून अमरावतीत आणले. आनंद नंदकिशोर भड (वय 22) असे संशयिताचे नाव आहे.

Nagpur News : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजयप्रताप तिवारी

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एमएनएलयू) नागपूरच्या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी प्रा. डॉ. विजयप्रताप तिवारी यांनी सोमवारी स्वीकारली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार यांच्यानंतर तिवारी यांनी पदभार स्वीकारला.

Dahi Handi Celebration : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने आज राज्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतील दादर (शिवाजी पार्क), वरळी, लालबाग, परळ, घाटकोपर, अंधेरी आणि बोरिवली येथे, तर ठाणे जिल्ह्यात टेंभी नाका, जांभळी नाका, वर्तक नगर आणि हिरानंदानी मिडोज येथे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. पुण्यातही कात्रज-कोंढवा रोड, वानवडी (संविधान चौक) व इतर भागांत विविध मंडळांतर्फे दहीहंडी आयोजन करण्यात आला आहे. अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांना राजकीय वलय असून, अभिनेता-अभिनेत्रींना प्रमुख आकर्षण म्हणून हजेरी असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT