Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : भाजपच्या प्रवक्ताच्या इशारा अन् सीजेपीच्या प्रवक्त्याकडून पोस्ट डिलिट; नेमकं काय आहे प्रकरण.....

Political Breaking Live Headlines Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना जखमी झालेल्या गोविंदांची महापौर रितू तावडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी विचारपूस केली. यासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...

सरकारनामा ब्युरो

BJP Vs CJP : भाजपचा प्रवक्ताच्या इशारा अन् सीजेपीच्या प्रवक्त्याकडून पोस्ट डिलिट; नेमकं काय आहे प्रकरण.....

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी शनिवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका बनावट फोटोवरून राजकीय वाद पेटला आहे. सौरव दास यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांच्या नावाने एक विधान जोडलेला फोटो पोस्ट केला होता. हा प्रकार समोर येताच गौरव भाटिया यांनी संतप्त प्रतिक्रिया देत दास यांना फटकारले. "ही खोटी पोस्ट त्वरित हटवून 24 तासांच्या आत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा," असा इशाराच भाटिया यांनी दिला. भाजप नेत्याच्या या भूमिकेनंतर आणि इशाऱ्यानंतर सौरव दास यांनी ती वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार; पाणी अन् सलाईन थांबवले, मुंबईच्या आंदोलनाची दिशा ठरणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मागण्यांच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय उपचार घेणार नाही, असे ठामपणे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. 11 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा मुंबईच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी परवा रात्रीपासून पाणी आणि सलाईन बंद केले आहे.

Hingoli Update : पावसाअभावी हिंगोली जिल्ह्यातील पिके 70 टक्के करपली; सोयाबीन हंगाम नष्ट झाला

हिंगोली जिल्ह्यात पावसा अभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी, सेनगाव हिंगोली व औंढा तालुक्यातील जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन अक्षरशः नष्ट झाले आहे, तर औंढा व वसमत तालुक्यातील वस्सा, मुडा, कानड, कौंसडी, ऊकळी, ऊंडेगाव परिसरात मागील महिनाभरापासून पाऊस न बरसल्याने सुकून गेलेल्या सोयाबीनवर शेतकरी नांगर फिरवण्याच्या तयारीत आहेत.

Amravati News : काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसोबत जेवण; विद्यार्थ्यांना केले मोठे आवाहन...

अमरावतीच्या मेळघाटमधील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत गेल्या काही दिवसांपासून भूत-प्रेत यांसारख्या अफवांमुळे विद्यार्थी शाळेत येण्यास घाबरत आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्वतः डोमा येथील शासकीय आश्रम शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत सायंकाळी जेवण घेतले. खासदार वानखडे यांनी यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांबरोर मनमोकळा संवाद साधला. भूतसारख्या काल्पनिक अफवांवर विश्वास न ठेवता, आपले शैक्षणिक नुकसान करू नका, पुन्हा शाळेकडे त्याच ताकतीने परत या, असे आवाहन खासदार वानखडे यांनी केले

नवी मुंबई पोलीस दलातील  ASI पी. एन. पाटील यांची आत्महत्या

नवी मुंबईतील रबाळे परिसरात ASI पी. एन. पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या कथित सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीष ठाकरे आणि आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांच्या नावांचा उल्लेख आहे.

75 व्या वर्षी नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांनी चालवली कार

वय हा केवळ आकडा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांनी. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवत पती विजयसिंह मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन सफर केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अकलूज येथील यशवंत नगर परिसरात हा अनोखा प्रसंग घडला. वयोमानामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे घरीच असतात. त्यांना थोडा विरंगुळा आणि बाहेरचा लोकांचा सहवास मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी नंदिनी देवी यांनी स्वतः इलेक्ट्रीक कारचे स्टेरिंग हाती घेऊन सफर घडवत आहेत.

मनसेचा आज ठाण्यात राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा

मनसेने आज ठाण्यात राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. गडकरी रंगायतन होत असलेल्या या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी कृष्णराजला युवक काँग्रेसच अध्यक्ष केले, धनंजय महाडिकांचं वक्तव्य व्हायरल

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरातील दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना मुलगा कृष्णराज महाडिक याचा उल्लेख महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असा केला आहे. फडणवीसांनी त्याच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली. त्याच्यावर किती प्रेम आहे बघा, अशा शब्दात त्यांनी वक्तव्य केलं, त्यांनी थेट काँग्रेस युवक अध्यक्ष असा उल्लेख केल्याने वडिलांनाच मुलाच्या पदाचा आणि पक्षाचा विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार -धनंजय महाडिक

विधानसभेप्रमाणे गोकुळचा स्कोर देखील 25 विरुध्द 0 असा राहील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार असं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

महापौर रितू तावडेंकडून जखमी गोविंदांची विचारपूस केली.

मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना जखमी झालेल्या गोविंदांची महापौर रितू तावडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी विचारपूस केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT