Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : दहा वर्षांत विधिमंडळात वैभव नाईक काहीच बोलले नाहीत, त्यांचा अभ्यासच नाही; दत्ता सामंतांची जोरदार टीका

Political Breaking Live Headlines Updates : पावसाने गेली महिनाभर खंड दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळस्थिती तीव्र झाली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...

सरकारनामा ब्युरो

Konkan Politics : दहा वर्षांत विधिमंडळात वैभव नाईक काहीच बोलले नाहीत, त्यांचा अभ्यासच नाही; दत्ता सामंतांची जोरदार टीका

कुडाळच्या राजकीय वर्तुळातून सध्या आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या विधिमंडळात ज्या ठिकाणी बोलायला हवं होते, तिथे वैभव नाईक कधीच बोलले नाहीत, कारण त्यांचा अभ्यासच नाही, अशी बोचरी टीका सामंत यांनी केली आहे.

Solapur Farmer News : ऊस बिलासाठी सोलापुरात शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन; महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर

सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन केले. अडीच कोटी रुपयांचे ऊस बिल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल झाडावर चढून आंदोलन केले. आंदोलनावेळी एका महिला शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले. यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या तहसीलदारांनी महिला शेतकऱ्यांचे अश्रू पुसले. महिला शेतकऱ्याला आईप्रमाणे जवळ घेणाऱ्या आणि डोळे पुसतानाचा तहसीलदार किरण जमदाडे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jalgaon News : जरांगे पाटलांनी अंतर्मुख होऊन विचार करावा; लक्ष्मण शिरसाठ यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये 'एसईबीसी' प्रवर्गाच्या माध्यमातून दहा टक्के कायदेशीर आरक्षण दिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल तयार करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले. जरांगे पाटलांनी एकेरी शब्दाचा वापर करू नये. त्यांनी सामाजिक जाण आणि भान ठेवून आदर करावा, असे आवाहन छत्रपती संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी केले.

Satara DCC Bank : मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचा शशिकांत शिंदे यांना नाव न घेता सूचक इशारा...

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आता हळूहळू रंगात येऊ लागली आहे. या निवडणुकीत ठराव घेण्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर जावळीतील राजकीय वातावरण हे अजूनही गरमच असल्याचे पाहायला मिळत आहे. जावळीतील दहीहंडी उत्सवादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत विरोधकांना इशारा दिला आहे. 'जंगल मे घुमते वक्त जंगल खामोश है, इसका मतलब ये मत समझो की, जंगल मे शेर नही है..,' उगीच आम्हाला डिवचण्याचे काम करू नका तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा शिवेंद्र राजे यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता दिला.

Marathwada Drought : पावसाचा महिन्याभरापासून खंड; दुष्काळ स्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात

मराठवाड्यात गेल्या महिन्याभरापासून खंड पडला असून, दुष्काळछाया गडद झाली आहे. लातूर, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील पिकांनी मान टाकायला सुरूवात केली आहे. काही मंडालांमध्ये 38 दिवसांपासून पाऊस झालेला नाही. पुढील काळात पाण्याचे संकट तीव्र होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT