Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिटनच्या दौऱ्यावर

Political Breaking Live Headlines Updates : मराठवाड्यात दुष्काळस्थिती, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठी आंदोलक आक्रमक, चलो मुंबईची हाक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिटीन दौऱ्यावर यासह महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...

सरकारनामा ब्यूरो

भारतीय जनता पार्टी म्हणजे 'रझाकाराची अवलाद'  : अंबादास दानवे यांची जहरी टीका

ठाकरे गटाकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी 'तुमसे ना हो पयेगा' या टॅगलाईन खाली मराठवाड्यात आंदोलन करण्यात येणार आहे. या हिंदी नावावरून पक्षावर टीका होत आहे. यावरून आमदार अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला थेट रझाकाराची अवलाद असे म्हणत जहरी टीका केली आहे.

खासदार रवींद्र चव्हाण जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीमध्ये दाखल

नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.

भारताने फिनटेक मध्ये मोठी मजल मारली - फडणवीस

भारताने फिनटेक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. भारतात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार होतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार

पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ४१० प्राथमिक शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदस्थापनेसाठी उपस्थिती नोंदवली आहे. या सर्व नवनियुक्त शिक्षकांना येत्या गुरूवारी (ता.१० रोजी)समुपदेशन केले जाणार असून यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार आहे.

जरांगेंच्या बारा मागण्या मान्य, उपोषण मागे घ्यावे; उदय सामंत यांचे आवाहन

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या तेरा पैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन उद्योग मंत्री तथा मराठा आरक्षण उपमितीचे सदस्य उदय सामंत यांनी केले आहे.

सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढतीची शक्यता

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांची धावपळ वाढली असून, कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चार प्रमुख राजकीय प्रवाह आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केल्याने सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

साउंड व्यावसायिकांचा पुण्यात मोर्चा

पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती चे पालन केल्यानंतर सुद्धा होते आहे कारवाई, असा आरोप साऊंड व्यावसायिकांनी केला आहे. दही हंडी उत्सव दरम्यान अनेक ठिकाणी नियम पाळून सुद्धा साउंड सिस्टिम जप्त केल्याचा व्यावसायिकांचा आरोप आहे. पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या जप्तीच्या कारवाई विरोधात व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. 10 सप्टेंबरला ते मोर्चा काढणार आहेत.

काँग्रेस मंत्र्याच्या घरावर ED चे छापे

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी ED ने आज सकाळी छापे टाकले आहेतच मनी लाँड्रिंग, आबकारी विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाचे टोकाचे पाऊल 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने विहिरीत उडी घेत जीवन संपवले. सुनील बिरादार असे या तरुणाचे नाव आहे. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सोमठाणा येथे ही घटना घडली. सुसाईड नोट लिहून तरुणाने जीवन संपवले

सिंहगड रोड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल

: सिंहगड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असून त्याबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात २१ सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.

या बदलांतर्गत भूमकर चौक, सर्व्हिस रस्त्याने स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना व स्वामीनारायण मंदिराकडून भुमकर चौकाकडे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने जाणारा सेवा रस्त्यावर एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. तसेच स्वामीनारायण मंदिराच्या समोरील बाजूस असलेला सेवा रस्ता जोडणाऱ्या पुलावर फक्त भुमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश राहील. स्वामीनारायण मंदिराकडून येणाऱ्या वाहनांना या पुलावर नो एन्ट्री करण्यात येत आहे. वाहनांनी मंदिराच्या डाव्या बाजूकडील सर्विस रोड एकेरी मार्गाचा वापर करून भूमकर चौकाकडे जावे. वाहनांना एकेरी मार्ग करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिटनच्या दौऱ्यावर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या ब्रिटीन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ब्रिटनच्या संसदेतील कार्यक्रमात ''कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन','इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६',‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT