vidhan parishad election
vidhan parishad election 
महाराष्ट्र

सोलापूरला वगळल्याने विधानपरिषद निवडणूकीला आव्हान देणार, इतर उमेदवार टेन्शनमध्ये

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या ८ रिक्त झालेल्या जागांच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर करताना सोलापूरची जागा वगळल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याबाबत निर्णय झाल्याची माहिती जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी दिली. बैठकीला पालिकेचे नगराध्यक्ष व १०० पेक्षा अधिक नगरसेवक उपस्थित होते.

जगताप म्हणाले, ४९५ मतदार असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संख्येतील ८५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या ४१० मतदार संख्या पात्र असून ती एकूण पात्र टक्केवारीच्या ८२ टक्के इतकी आहे. मात्र तरीही केवळ अपुऱ्या महितीच्या आधारे ७५ टक्क्यापेक्षा कमी मतदार असल्याची चुकीची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे.

अपेक्षित मतदार संख्या नसल्याचे दाखविण्यात आल्याने निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील विधानपरिषद जागेची निवडणूक वगळून इतर ६ जागांची निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.

या निवडणूकीला न्यायालयात आव्हान देण्याच्या निर्णयामुळे इतर ६ ठिकाणचे इच्छूक उमेदवार आता देव पाण्यात ठेवण्याची शक्यता आहे. कारण ८ जागांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. अशा स्थितीत निवडणूक न्यायालयात गेल्यानंतर जर कार्यक्रमाला स्थगिती मिळाली तर मात्र आमदार होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागू शकते.

निवडणूक आयोगाने मुंबई, कोल्हापूर नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम या ५ मतदारसंघातील ६ जागांसाठी निवडणूक जाहिर केली आहे. यासाठी १० डिसेंबरला मतदान होणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अहमदनगर आणि सोलापूर या मतदारसंघातील मतदार अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांची संख्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या ठिकाणी निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पार पडल्यानंतर त्या घोषित होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT