Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : शरद पवारांचे खासदार आज PM मोदींना भेटणार

Marathi Breaking Live Headlines Updates : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत, यासह आज दिवसभरातल्या विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

PMC News: पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी देणार

पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी दिल्या जाणार आहेत. यापूर्वी पाच शाळा आकांक्षा फाउंडेशनला दिल्यानंतर आणखी आठ शाळेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिल्या जाणार

पुणे महानगरपालिकेच्या पाच शाळा आकांक्षा फाउंडेशनला चालवण्यासाठी दिल्यानंतर आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा येरवडा, संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा कोंढवा, पुण्यश्लोक आहिल्यादेवी शाळा औंध स्वर्गीय विठ्ठलराव तुपे शाळा हडपसर, पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा कोथरूड आणि आचार्य विनोबा भावे शाळा गंज पेठ सम्राट अशोक विद्या मंदिर कर्वेनगर या शाळांचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करा; आमदार श्वेता महालेंची मागणी

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करा भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनातून त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी केली आहे.

संघ आदिवासी संस्कृती संपविण्यासाठी काम करीत आहे - हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट शब्दात हल्ला केला आहे. संघ हा आदिवासी संस्कृती संपविण्यासाठी काम करीत आहे. त्यांच्यापासून आदिवासींना सावध राहावे लागेल. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक येथे आदिवासी मेळावा झाला. यावेळी सपकाळ यांनी संघ आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. राज्यातील सरकार आदिवासींच्या जमिनी आणि संपत्तीवर आक्रमण करीत असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांचे खासदार आज PM मोदींना भेटणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. सकाळी ११ वाजता हे खासदार मोदींना भेटण्यासाठी जाणार आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीर खासदारांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. लोकसभा अध्यक्षांचा मंजुरीचा निर्णय चुकीचा असून या खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT