Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमतासाठी सत्ताधारी पक्षाने आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून बैठकीत आणले

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Roshan More

Kidnapping Murder : कॉम्प्युटर शिक्षकाने AI च्या मदतीने अपहरण, खंडणीसाठी आखला भयावह प्लॅन

गोरखपूरमध्ये 10 वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयित आरोपी कॉम्प्युटर शिक्षकाने AI च्या मदतीने अपहरण, खंडणी आणि पोलिसांपासून बचाव करण्याची संपूर्ण योजना आखल्याचे तपासात आले समोर.

BMC Standing Committee : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमतासाठी सत्ताधारी पक्षाने आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून बैठकीत आणले

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून बैठकीत आणण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते थेट सभागृहात पाहायला मिळालेत. त्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच आश्चर्य व्यक्त केलं जात असून सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

पुणे महापालिकेतील ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पुणे महापालिकेतील सुमारे ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. मतदार यादी पुनर्परीक्षण मोहीम (एसआयआर) संपल्यानंतर या बदल्या केल्या जाणार होत्या. पण कर्मचाऱ्यांना तक्रारींना वेळच मिळू नये यासाठी या बदल्या केल्याची चर्चा आहे. बदल्या केलेल्यांमध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.या बदल्या करताना ज्यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत अशांची बदली न करता तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच जे कर्मचारी अनेक वर्षे एकाच खात्यात होते, त्यांना पुन्हा तेथेच संधी दिली आहे

अतिवृष्टीत लाखोंचे नुकसान; पीक विमा मात्र हेक्टरी अवघा ९८५ रुपये

: खरीप २०२५ पीक विम्याच्या वितरणाला धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होताच भरपाईतील मोठी तफावत समोर आली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी अवघे ९८५ रुपये पीक विमा मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या हेक्टरी विमा प्रीमियमएवढीही भरपाई मिळालेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणारी मदत अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यातच विमा कंपनीकडूनही अत्यल्प भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला आहे.

विशेषतः वाशी तालुक्यातील वडजी येथील शेतकऱ्यांना हेक्टरी अवघे ९८५ रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही एवढीच भरपाई मिळाल्याने सरकार आणि विमा कंपनीने पूरग्रस्त शेतकऱ्यांची 'क्रूर चेष्टा' केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सीओईपीमधील वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचा आराखडा सादर करा - चंद्रकांत पाटील

सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ना. पाटील यांनी आज सीओईपीमधील मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहांची तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोट क्लब परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या उत्पन्नाच्या चौकशीसाठी निवडणूक आयोग, GST ला आरटीआय कार्यकर्त्याचे पत्र

गुजरातमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक स्थितीची तसेच सीजेपीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कायदेशीर बचाव निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय GST विभागाकडे पत्र पाठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT