अंबादास दानवे हे मुळात स्वयंमसेवक होते. संघाच्या शाखेत पण जायचे. हिंदुत्व विचाराचे आहेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली. त्यांना किती वेदना व्हायच्या त्यांनी मला एकट्यामध्ये सांगीतलंय. आंबदास दानवे हिंदुत्वाच्या आणि संघाच्या बाजूने येत असतील तर स्वागत आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्य अकोल्यातील महान गावात भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हजारो संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. मिरवणूक सुरू असतानाच अंतर्गत वाद उफाळला. तर हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मिरवणुकीतील काही जणांनी हात उगारला. यावेळी पोलिसांच्या मागे मिरवणूकीतील लोकांना पाठलाग केला. तसेच पोलिस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांना जबर मारहान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त 'महान' गावात दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जबाबदारीचे असून हे पदक ते बाळगताना परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी हे पदक आदर्श ठरणारे आहे. आपल्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास केला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थात्मक रचना निर्माण करावी लागेल, असे मत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केले.
राज्यातील सन २०२३ व २०२४ मधील उत्कृष्ट अन्वेषणासाठी निवड झालेल्या एकूण २२ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना भारत सरकार, केंद्रीय गृहमंत्रालय पुरस्कृत ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्याचा पुरस्कार वितरण समारंभ पोलिस संशोधन केंद्रात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर आधारवाडी कारागृहातून सुटका झाली आहे. हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी असल्याने रमेश म्हात्रे थेट गोव्याला रवाना झाले आहेत.
नवी मुंबईत भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. नवनाथ बन यांनी राज ठाकरे हे मुलगा अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी तरुणांची गरज असल्याने त्यांच्यासोबत आंदोलन करत असल्याची टीका केली होती. यावर मनसे प्रवक्ते आणि पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी नवनाथ बन यांच्यावर जहरी टीका केली. “फडणवीसांचे बूट चाटून नवनाथ बन यांची जीभ खराब झाली असून, ती अधिक खराब होऊन गळून पडेल,” असा घणाघात योगेश चिले यांनी केला.
राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी किमान संवादापुरती मराठी भाषा बोलावी, यासाठी सरकारने मराठीचे धडे देण्याचे अभियानही राबवले आहे. दरम्यान, अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. आता ही वेळ संपत आली आहे. त्यामुळेच मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई होणार का? असे विचारले जात आहे. याच प्रश्नाचे आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे. मराठी भाषा न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर येत्या 17 ऑगस्टनंतर कारवाई होणे अटळ असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे. तसेच मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत वाढवून मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. राजकीय वर्तुळात या विमान प्रवासाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. आता विमानामधून प्रवास करताना माझ्यासोबत राहुल गांधी देखील प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मनाई आहे का? असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
मुंबई-नागपूर असा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मागे एकाच विमानातून प्रवास झाला होता, त्यावेळी अशीच चर्चा रंगली होती. आजही जयंत पाटील आणि फडणवीस एकाच विमानातून कोल्हापूरला गेले, त्यामुळे चर्चा रंगली आहे. ते कर्मिशयल विमान आहे, तिकिट काढून लोकं बसतात. आता विमानात विरोधकांना बसू द्यायचं नाही का, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी आजच्या पाटील-फडणवीस विमान प्रवासावरील चर्चेतवर केला.
उपमुख्यमंत्री (स्व.) अजितदादा पवार यांच्या आठवणीने मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा भावूक झाले. आज त्यांच्याविना सभा घेत असल्याचं दुःख व्यक्त करत अजितदादा यांचे नाव घेत मुश्रीफ भावनिक झाले होते.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममती बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या मृत कार्यकर्त्याच्या घरी जाताना उत्तर २४ परगणा जिल्ह्यात हा हल्ला ममता बॅनर्जी यांच्यावर झाला आहे. त्यांच्या गाडीवर दगडही फेकण्यात आले आहेत. आमच्या गाडीच्या काचा बंद नसत्या तर आमची डोकी फुटली असती, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मतदासंघातील कामासंदर्भात भेटणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मात्र, त्यावरून राज्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सावध भूमिका घेत शरद पवार हे महाविकास आघाडीसोबतच आहेत, असे सांगितले. पण काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दरबारात काय जात आहेत. पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ते ठीक आहे. पण इतर नेते त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना दिसत आहेत. त्यामुळे आतून काहीतरी शिजतंय, असं वाटतंय, असे म्हटले आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, काही जणांकडून कुंभमेळ्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे. कुंभमेळ्याला अजून काही काळ बाकी आहे, तोपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. काही तुरळक ठिकाणी पाऊसाच्या सरी कोसळत आहे. मात्र, महाराष्ट्रात १३ ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे सांगलीतील आष्टा येथे प्रकाशन झाले. याचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री डांगे यांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान केला एकत्रित विमान प्रवास
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर
तर आमदार जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघात
मात्र दोघांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधान
बारामतीमधील विमानतळ परिसरात एक शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हे विमान नेमके कशामुळे कोसळले. तसेच या घटनेत पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून मंत्री आशिष शेलारांनी हल्लाबोल केलाय... राज ठाकरे महामार्गाबद्दल प्रामाणिक आहे का?... असा सवाल करत मनसेनं प्रामाणिकपणाची परीक्षा द्यावी असं थेट आव्हान शेलारांनी दिलंय..
पुणे -नाशिक रेल्वेच्या चक्काजाम आंदोलनावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधलाय. सरकार मार्ग काढत असताना आंदोलन करण्यात आणि विनाकारण राजकारण करण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.
आज कॉंग्रेसनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ९५ हजार ६०३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहेत, अशी माहिती सहकार विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची राज ठाकरे प्रत्यक्ष पाहणी केली. राज ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील माणगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान जमीन तुमची जमीन तुमचं अस्तित्व आहे विकू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी भूमिपुत्रांनीा केले.
ॉकेंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जबाबदारीचे असून हे पदक ते बाळगताना परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी हे पदक आदर्श ठरणारे आहे. आपल्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास केला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थात्मक रचना निर्माण करावी लागेल, असे मत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केले.
राज्यातील सन २०२३ व २०२४ मधील उत्कृष्ट अन्वेषणासाठी निवड झालेल्या एकूण २२ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना भारत सरकार, केंद्रीय गृहमंत्रालय पुरस्कृत ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्याचा पुरस्कार वितरण समारंभ पोलिस संशोधन केंद्रात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डी.वाय.दादा आणि माझ्या वयात फार मोठं अंतर होतं. तरीसुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना फार वेळा त्यांचे माझे संबंध आले. आमचे सहकारातील गुरु शामराव भिवाजी पाटील आणि डी.वाय.दादांची फार मोठी मैत्री होती. आमदार असतात त्यांनी केलेलं काम आणि राजाराम सहकारी कारखाना कारखाना होण्यासाठी त्यांनी दिलेला लढा. एखाद्या राकट पाटील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे डी.वाय.पाटील होते, अशा शब्दात हसन मुश्रीफांनी डी.वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला.
नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर चाकणमार्गे व्हावी ही मागणी आहे. त्यात राजकारण आडवे आल्याने हा मार्ग बदलण्याचे प्रयत्न आहेत. त्याला आज लोकप्रतिनिधी थेट आव्हान देणार आहेत. नाशिक पुणे रेल्वे मार्ग प्रक्रिया सुरू असताना अचानक तो शिर्डी मार्गे वळविण्यात आला. त्या विरोधात या भागातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा संताप आज रस्त्यावर उतरणार आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाच ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. संगमनेर (हिवरगाव) येथे थोरात आणि खासदार निलेश लंके नाशिक पुणे रेल्वे रास्ता रोको करतील. समृद्धी महामार्गावर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको होईल.
नवी मुंबईत भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. नवनाथ बन यांनी राज ठाकरे हे मुलगा अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी तरुणांची गरज असल्याने त्यांच्यासोबत आंदोलन करत असल्याची टीका केली होती. यावर मनसे प्रवक्ते आणि पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी नवनाथ बन यांच्यावर जहरी टीका केली. “फडणवीसांचे बूट चाटून नवनाथ बन यांची जीभ खराब झाली असून, ती अधिक खराब होऊन गळून पडेल,” असा घणाघात योगेश चिले यांनी केला.
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर आधारवाडी कारागृहातून सुटका झाली आहे. हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी असल्याने रमेश म्हात्रे थेट गोव्याला रवाना झाले आहेत.
पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा, असं मत राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जबाबदारीचे असून हे पदक ते बाळगताना परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी हे पदक आदर्श ठरणारे आहे. आपल्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास केला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थात्मक रचना निर्माण करावी लागेल, असं दाते यांनी म्हटलं आहे. राज्यातील सन २०२३ व २०२४ मधील उत्कृष्ट अन्वेषणासाठी निवड झालेल्या एकूण २२ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना भारत सरकार, केंद्रीय गृहमंत्रालय पुरस्कृत ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्याचा पुरस्कार वितरण समारंभ पोलिस संशोधन केंद्रात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुण्यात ११ ऑगस्ट पासून दूध दरात दोन रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार आहेत. गायी आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ होणार आहे. डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते आष्ट्यासह कागलमधील विविध विकासकामाचं उद्धाटन करणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. रात्री झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. प्रशासनाने नागरिकांनी संयम ठेवण्याच्या आणि रात्री सुरक्षित ठिकाणी झोपण्याचं आवाहन केलं होतं. तसंच अफवा पसरवू नये असंही आवाहन रात्री प्रशासनाने नाशिककरांना केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.