- महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मातर प्रकरणानंतर कंपनीचे युनिट बंद होणार
- कंपनीतील कामगारांना मुबंई, पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतले जाणार
- सध्या कंपनीत कर्मचाऱ्यांना येणास मनाई
- पोलीस तपास सुरू असल्याने काही ठरविक जण कंपनीत येत असल्याची सूत्रांची माहिती
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याचं वृत्त असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्राची सगळ्या बाजूने चोरी होत आहे, महाराष्ट्राचे वैभव सगळ्या बाजूने चोरले जात असल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. गेल्या १० ते १२ वर्षात क्रिकेटची पंढरी हे नाव इतिहासजमा होत आहे. इतिहास काळाच्या ओघात नाश पावत असून कबड्डी खेळाचे जतन आपण केलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
परळ येथील तबेला मैदान-श्रमिक जिमखाना हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भास्कर जाधव यांनी हजेरी लावली होती.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री शंतनू बिराेजे यांनी सांगितले की, कमलादेवी कॉलेजमधील विद्यार्थ्याना शैक्षणि साेयी सुविधा पुरविल्या जात नाही. त्याठिकाणी अस्वचछता आहे. स्वच्छता गृह नाही. कॉलेजच्या इमारतीला मधमाशांचे पाेळे आहे. मैदानाची समस्या आहे. या समस्या दूर करण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२५ मध्ये कॉलेज प्रशासनाला एक निवेदन दिले होते. तरी देखील परिस्थिती जैसे थे आहे. त्याचबराेबर आयुष बरई या विद्यार्थ्याने कमलादेवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला हाेता. त्याचा अन्य शैक्षणिक शाखेत प्रवेश वर्ग केला आहे. ही बाब त्या विद्यार्थ्याला विश्वासात न घेता करण्यात आल्याचा आरोप बिरोजे यांनी केला आहे. या सगळ्याच्या विरोधात बोंब ठोक आंदोलन कॉलेजसमोर केले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपुरात येणार आहेत. त्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात हळदी कुंकू आणि फुले टाकून अनोखे आंदोलन केले. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश होणार आहे.
नांदेड दौऱ्यावर असताना विधिमंडळ अंदाज समितीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील एका शाळेवर आणि वाळू घाटावर पाहणी केली होती. या दौऱ्यावरून अशोक चव्हाण यांनी समितीला सवाल केलाय. समितीचा निष्कर्ष समोर यावा, संपूर्ण अहवाल समोर यावा, त्या अहवालाच्या आधारावर दोषींवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे असे चव्हाण म्हणाले. समितीने वसुली केल्याची चर्चा सुरु आहे असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला.त्यावर समितीने वसुली केल्याची जी चर्चा सुरु आहे. त्यातली सत्यता लोकांसमोर आले पाहिजे असे चव्हाण म्हणाले.
इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेत नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या निर्णयामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो. अशा वेळी विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशाच अभ्यासक्रमातून हटवण्यात आल्याने इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे. यावर छत्रपती घराण्याकडूनही आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
कोल्हापूर सीपीआरमधील लाल डायरीप्रकरणी चौकशीत दोषी असल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर व तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश रात्री उशिरा सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी नील कुमेरीये यांनी काढले आहेत. दरम्यान लाल डायरी प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आंदोलन केलं होतं. तसेच जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी निदर्शने करत याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाच प्रश्न करू असे म्हणत आंदोलनाचा इशारा दिला होता.
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांना आठ कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे. मात्र, आमचे खासदार अनिल देसाई यांना एक रुपयाही निधी दिलेला नाही. मलाही निधी दिलेला नाही. विकास करणं फक्त त्यांचाच दंडक आहे का, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी केला.
हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कार पार्किंगच्या जागेत लॅंड करण्यात आले. हे फार सिरियस आहे, असे मला वाटत नाही. पण ती चूक नक्कीच आहे. हेलिपॅडऐवजी कार पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर लॅंड करतोय, अशी कोणतीही कल्पना पायलटने मला दिलेली नव्हती, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पुण्यातील नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी रिलस्टार पोलिस सोनाली हिंगे हिच्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दामिनी पथकातील सोनाली हिंगे, पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस शिपाई सुदाम तायडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीतील प्रेरणा स्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट झाली. महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन केल्यानंतर या दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या तब्येतची विचारपूस केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, अर्जून मेघवाल उपस्थित होते.
शिवसेनेच्या भटक्या विमुक्त सेलच्या बीड जिल्हाप्रमुख संजय लकडे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. पारगावमधून बीडच्या दिशेने येताना त्यांच्यावर ही दगडफेक करण्यात आलेली आहे. या दगडफेकीत लकडे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दगडफेकीचे कारण आणि करणारे हे दोन्ही अद्याप अज्ञात आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मला बोलावण्यात आली नाही तर अजितदादा पवार यांच्यासाठी मी प्रचाराला जाणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना सांगितले.
जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर जळगावमध्ये हल्ला झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने रिंगरोड परिसरात सपकाळे यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी सुरूच आहे. निवडणुकीआधी नेते मंडळी तिकीटासाठी पक्ष बदलत होते. परंतु आता निवडणूक झाल्यानंतरही काही नेते पक्ष सोडत असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीनंतर सोलापूर, पंढरपूरमध्ये गेमचेंजर ठरणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याचे समोर आलं आहे. आघाडीत फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा 74 वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे भाषणात कौतुक केले.
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपासात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. चौकशीदरम्यान खरातने बाहेर पडण्याची आशा नसल्याचे सांगत निराशा व्यक्त केली. त्याच्यावर आतापर्यंत 15 गुन्हे नोंद आहेत. दररोज 8 ते 10 तास चौकशी सुरू असून, ईडीने त्याची तीन बँक खाती सील केली आहेत.
खानवडी, पुरंदर येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये लँडिंग झाल्याने खळबळ उडाली. जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनासाठी ते गावात आले होते. पायलटच्या या चुकीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे.
घुसखोरी...वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी...म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे...चाळीस एक लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतात...दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत..असे एका स्मरणिकेत शरद पवारांनी म्हटले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे थकीत कर्ज वसुलीसाठी एनसीडीसीने (राष्ट्रीय सहकारी विकास निगम) ‘सरफेसी’अंतर्गत ई- लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. थकीत कर्ज वसूल करण्यासाठी २२ मे रोजी लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
नांदेड शहरालाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा इथं झालेल्या 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे संपूर्ण नांदेड शहरात बसले. अचानक जमीन हादरल्यानं आणि घरांच्या पत्रांचा आवाज आल्यानं नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुदैवानं कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होता. यात IAS तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश होता. मुंढे यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका आहे, अशी तक्रार बीड येथील एका व्यक्तीने अशोक खरातच्या विरोधात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (SIT) केली आहे.
नदी सुशोभिकरणापेक्षा नदीच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन कामासाठी समर्पित असे स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील बुधवार पेठेत ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली महिलेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार एका लॉजमध्ये घडला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन कदम याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. NIA, ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची होईल, असे सुत्रांनी सांगितले.दरम्यान,लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन केली असून त्यांच्यामार्फत तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.