लाडकी बहीण योजनेची केवायसी करणाच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गोकुळ चव्हाण याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर गड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवण्यात आलं होतं. सुदैवाने अपघात झाला नाही. दरम्यान, या प्रकरणाचे डीसीजीए चौकशीचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री यांनी पण या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठीची शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेने अतिरेकी आणि बेकायदेशीर मागण्या केल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी इराणने त्यांच्या कोणत्याही अटी मान्य न केल्यामुळे इराणसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्याचं जाहीर केलं आहे.
आशा भोसले यांना छातीतील संसर्गामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती आशा भोसलेंची नात जनाई भोसले यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य एकनाथ शिंदेचे जंगी स्वागत करणार आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर शिंदेच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात होणार असून कान्हेरीतील मारूती मंदिरासमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.