कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज सायंकाळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. जोरदार आणि गारांचा पाऊस पडल्यामुळे कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथं घराचं आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालेलं आहे.
ठाणे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज (ता. १४ ) कार्यालयात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते..
आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्ष नेते शहाणू पठाण, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक अभिजीत पवार, नगरसेविका मनीषा भगत,नगरसेविका मार्झिया पठाण इ. पदाधिकारी इफ्तार पार्टीसाठी उपस्थिती होते
जालना शहरात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे निदर्शने करण्यात आले..
राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले..
भाजपाने जोरदार काॅंग्रेसच्या आंदोलनला जोरदार प्रतिकार करण्यास सुरूवात केले आहे..
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक भागात आज (ता.14) सायंकाळी अचानक जोरदार वारा आणि पाऊस सुरू झाला. झालेल्या पावसामुळे स्थानिकांची धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. दिवसभर उखाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
काही भागात जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला आहे. जोरदार आणि गारांचा पाऊस पडल्यामुळे कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे घराचं आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झाले आहे.
होर्मुझमधून 2 LPG टॅंकर भारतात रवाना झाल्याची बातमी समोर आली आहे. याने भारतातली गॅस तुटवडा टळणार असल्याचे बोलले जात आहे. इराण - अमेरीका युध्दाच्या पार्श्वभुमीवर जगभरात खळबळ माजली आहे. त्यामध्ये भारतासाठी ही आनंदाचची बातमी आहे.
गॅस तुटवडा प्रकरणी देशभरात काँग्रेसचे आंदोलनं सुरू आहेत. याप्रकरणी शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी काँग्रेसवर जहरी टिका केली आहे.
काँग्रेसच्या हाती काही राहिलं नाही म्हणून असं काहीतरी करून पत्रकार आणि जनतेच लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याचं काम काँग्रेस करीत असल्याचा आरोप गोगावले यांनी केला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा तिढा सुटलेला आहे, तशा प्रकारे लवकरच रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. माझा महायुतीमधील वरिष्ठ नेत्यावर विश्वास आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही", असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासावरही भाष्य केले.
कोलकातामध्ये भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. तृणमूल काँग्रेसचे मंत्री जखमी झाले आहेत. तृणमूल काँग्रेसवर भाजप कार्यकर्त्यांना अडथळा आणल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यापासून रोखत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
पुण्यात गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे. अखाती युद्धाच्या परिणामामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात आंदोलन करत नाराजी व्यक्त केली.
इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे गॅस पुरवठा खंडित झाला आहे. घरगुती गॅसचा पुरवठा काही प्रमाणात होत असला तरी, व्यावसायिक (Commercial) ठिकाणी गॅस मिळणे कठीण झाले आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणी आता पर्यायी मार्ग म्हणून कोळशाचा वापर करू लागल्या आहेत.
पुण्यात गॅस टंचाईमुळे लग्नातील जेवणाचे मेनू कमी झालेत. लग्न समारंभांमध्ये १०० ते दीडशे प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. मात्र LPG गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी मेनू अर्ध्यावर आणण्यात आलेत. एवढच नाही तर मंगल कार्यालय व्यवसायिकांवर चुली पेटवण्याची वेळ आली आहे.
देशातील गॅस टंचाईचा फटका आता शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही बसला आहे. इंधनाची बचत करण्यासाठी संस्थानने आजपासून साईभक्तांना केवळ एकच लाडू प्रसाद पाकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज होणारी 45 हजार पाकिटांची विक्री आणि 50 हजार बुंदी पाकिटांचे मोफत वितरण यामुळे गॅसचा वापर वाढतो, परिणामी काटकसर करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आता ठोस पावले उचलली आहेत. यासाठी नवीन पात्रता निकष आणि अटी जाहीर करण्यात आल्या असून, या प्रक्रियेला ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुले आता राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये नव्या निकषांनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे निर्माण होणार असून तब्बल २१ वर्षांनंतर ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.
पुण्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठीचौथ्या दिवशी गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. होम डिलिव्हरी वेळेत मिळत नसल्याने अनेक पुणेकर स्वतः सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर येत आहेत.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे इथून पुढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव नव्हे तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव असणार आहेत. कारण राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दिव्यांग कल्याण विभागाच्या नावात बदल करून तो आता 'दिव्यांग सक्षमीकरण विभाग' या नावाने ओळखला जाणार आहे. तसेच विभागाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला अून याबाबतचा शासन निर्णय विभागाने आदेश जारी केला आहे.
भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना, टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी संसदेत केली आहे. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत, सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न खासदार महाडिकांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात उपस्थित केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गंभीर दखल घेतली आहे. दांडी बहाद्दर मंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष सोमवारी देणार समज देणार आहे. अनुपस्थित असलेल्या सचिव आणि प्रधान सचिवांवरही कारवाई होणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली, मुंबई येथील अतिक्रमण निष्कासन व अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून नियोजन करावे. निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीतील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे 'नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027' संदर्भातील शिखर समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्र्यंबक–नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी 22 हजार 181 कोटींच्या कामांना बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ₹5140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील ₹17,041 कोटींच्या कामांचा समावेश आहे.
इराणकडून भारताला ग्रीन सिग्नल देत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय झेंडे असलेले दोन एलपीजी जहाजांना प्रवासाची परवानगी दिली. दोन दिवसांपूर्वी इराणने भारतीय झेंडा असलेल्या तेल जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनी जाण्यास परवानगी दिली होती.
17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिका इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींची माहिती देणाऱ्यास 1 कोटी डॉलर्सचं बक्षीस जाहीर केले आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी'द्वारे इराणची राजवट संपवण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.