Live Update 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : धक्कादायक! महिलेवर अत्याचार करून चावडीवर बांधलं

Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्रासह देशभरातली आज 15 फेब्रुवारीच्या सर्व राजकीय, प्रशासकीय घडामोडी एका क्लिकवर

सरकारनामा ब्युरो

Air India Flights Canceled एअर इंडियाच्या दुबई,अबुधाबीच्या विमान फेऱ्या रद्द

एअर इंडियाच्या दुबई,अबुधाबीच्या विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिडल ईस्टमधील युद्धामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुबईला जाणाऱ्या 6 पैकी 5 विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहे. अबुधाबीला जाणारी सर्व विमाने सध्या स्थगित करण्यात आली आहे. विमान फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल होताय.

Beed धक्कादायक! महिलेवर अत्याचार करून चावडीवर बांधलं

विवाहितेवर अत्याचार करून तिला थेट गावच्या चावडीवर बांधण्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातल्या हिवरा पहाडी या गावात घडलाय. ही विवाहिता घरात झोपलेली असताना संशयीत आरोपी वैभव पेटकर यानं थेट तिला उचलून नेलं. तिला गावाबाहेर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर रात्रीच तिला गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवलं. रात्रभर ही महिला चावडीवर बांधलेल्या अवस्थेत होती. सकाळी गावकऱ्यांनी हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी वैभव पटेकरला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. वैभवला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या धक्कादायक घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Dharashiv Update : दुबईत अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे युद्धकाळात प्रशासनाचे दुर्लक्ष

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने दुबईत अडकलेल्या धाराशिवच्या उमरग्याच्या चार ज्येष्ठ नागरिकांनी भारतात परतल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उमरगा इथल्या आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे व सुजाता दळगडे तसेच सोलापूर इथले सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवानंद माशाळकर व मीनाक्षी माशाळकर हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे अचानक बंद झाली आणि ते दुबईत अडकून पडले. या चौघांना तब्बल 1 लाख 56 हजार 996 रुपये खर्च करून मायदेशी परतावे लागले.

America-Iran War : अमेरिका-इराणच्या युद्धमुळे सिंचन साहित्याचे दर कडाडले

आखाती प्रदेशातील या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचा थेट फटका शेती क्षेत्रालाही बसू लागला आहे. विशेषतः सिंचनासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कच्चे तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळणाऱ्या काही घटकांपासून सिंचनासाठी वापरले जाणारे पीव्हीसी पाईप, ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य तयार केले जाते. सध्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे या साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन यंत्रणा, पीव्हीसी पाईप, मोटार पंप तसेच मोटार पंपासाठी लागणाऱ्या केबल्स यांच्या किमतीत सुमारे 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करू; डोनाल्ड ट्रम्प

इराणच्या किनाऱ्यावर अमेरिका जोरदार बॉम्ब वर्षाव करत राहील आणि इराणच्या बोटी व जहाजे सातत्याने उद्ध्वस्त करेल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करू, सुरक्षित आणि मुक्त करू, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझसाठी इराणविरोधात दंड थोपटले आहेत.

Donald Trump on Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी हे जिवंत नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

इराणध्ये आयतुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत मोठा दावा केलाय. मोजतबा खामेनी हे जिवंत नाहीत, असं मोठं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

Iran US Conflict : डोनाल्ड ट्रम्पच्या प्रक्षोभक धमकीनंतर इराणचा संताप, अमेरिकन तळांना लक्ष्य केलं

अमेरिकन हल्ल्यात इराणच्या खार्ग बेटाचा मोठा हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. "आम्ही केवळ मनोरंजनासाठी देखील या बेटाला पुन्हा लक्ष्य करू शकतो," अशी प्रक्षोभक धमकीही त्यांनी दिली आहे. यानंतर संतापलेल्या इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य केलं. इराणने युएई (UAE), बहरीन आणि कुवेत मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला चढवला. इराणकडून इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करणे सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना इराण प्रत्युत्तर देत आहे.

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळाकरिता 22 हजार 181 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा 2027चे आयोजन करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी 22 हजार 181 कोटी रुपयांच्या कामांना विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5 हजार 140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17 हजार 41 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

Goverment On LPG Cylinder Shortage : ना रिफिलिंग, नाही नवीन कनेक्शन; गॅस पुरवठ्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अधिसूचना जारी करत, 'ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस कनेक्शन आहे ते आता 'एलपीजी' म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलिंडर मागवू शकणार नाहीत आणि ना नविन कनेक्शन घेऊ शकणार, नाही रिफिल करू शकणार आहेत. सोबतच ज्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी नंतरचे कनेक्शन परत करावे आणि कोणत्याही सार्वजनिक तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून सिलिंडर रिफिल घेण्यापासून देखील दूर राहावे, असे म्हटलं आहे.

Kolkata clash : पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी कोलकातामध्ये भाजप अन् तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दंगल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीपूर्वी कोलकातामध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले, सुरुवातीला वाद झाला, या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत आणि दगडफेकीत झालं. या धक्कादायक घटनेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Anil Ambani NEWS : अनिल अंबानींच्या मुलाची सलग दुसऱ्या दिवशी सीबीआय चौकशी

यूनियन बँक आॅफ इंडियाच्या 228 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रिलायन्स होम फायन्सास लिमिटेडचे माजी संचालक आणि अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल याची सलग दुसऱ्या दिवशी सुमारे पाच तास चौकशी केली. आरएचएफएल माजी सीईओ रवींद्र सुधाकर यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल झाले आहे.

India And US : अमेरिकेत 11 भारतीयांविरोधात गंभीर गुन्हे दाखल

अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या 11 भारतीयांविरोधात गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहे. दुकानांमध्ये दरोडा टाकणे, व्हिसाबाबत फसवणूक करणे, ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी इमिग्रेशन अर्जावर आपण गुन्हेगारीला बळी पडल्याचे खोटे सांगणे, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंदवण्या आले आहेत.

Shirdi News : गॅस टंचाईमुळे शिर्डीतील साईमंदिराच्या प्रसादात कपात

गॅस टंचाईमुळे शिर्डीतील साईबाब संस्थाच्या प्रसादालयातील भोजन व्यवस्थेत आणि लाडू प्रसादात कपात करण्यात आली आहे. वरण-भाताऐवजी मसाले भात, एक रस्सा भाजी आणि चपाती तसेच गुळ-शिरा भाविकांना प्रसाद म्हणून, तर एका भाविकाला एकच लाडू पाकीट देण्यास शनिवारपासून सुरूवात केली आहे.

Chandrapur Update : लोहारडोंगरी खाण प्रकल्पात भाजप आमदाराची भागीदारी

चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी इथल्या प्रस्तावित लोहखाण प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळान वन्यजीवविषयक परवानगी दिली. या प्रकलाप नागपूर इथल्या भाजप आमदाराची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे. अतिशय घाईघाईन परवानी देण्यात आल्याने या प्रस्तावाबाबत, राजकीय हितसंबंधांना प्राधान्य देण्यात आल्याची आता शंका उपस्थित केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT