शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न' जगप्रसिद्ध आहे. पण याच लातूरमध्ये एका खासगी शाळेच्या शिक्षकानं संतापजनक कृत्य केलंय.. धाब्यावर मित्रांसोबत दारू पित सिगारेट ओढत विद्यार्थ्यांचे पेपर तपासलेत. एवढंच नव्हे तर त्याने त्याच्या मद्यपी मित्रानांही पेपर तपासायला दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय... या घटनेमुळे आता पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.. तर मद्यपी शिक्षकाच्या या कारनाम्यानंतर शाळा प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी एचआर निदा खान फरार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून तीचा शोध घेतला जात आहे. दिल्ली ब्लास्टशी तिचे कनेक्शन असल्याचा संशही व्यक्त केला जात आहे. तसेच ती भिवंडीत लपल्याचा संशय आहे.
अशोक खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला 3 महिन्यापूर्वी होती, मग तीन महिने ही माहिती का थांबवली होती? असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकमधील आयटी कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहणारी आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा आरोप असलेल्या निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये पुणे महापालिकेतच जोरदार राडा झाल्याची घटना बुधवारी घडली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा वाद माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिकमधील नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकरणाची दखल कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने घेतली आहे. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कंपनीची चौकशी सुरू आहे. तपासाच्या काळात कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम'चे करण्याचे आदेश दिले आहेत.
शेताला पाणी मिळत नाही पण खरातला पाणी मिळतं. ही प्रकरण पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवलेली ती आता बाहेर काढतात, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरात प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. बहुचर्चित महिला आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे अधिवेशन असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.