Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update: नागपूरचे जिल्हाधिकारी ईटनकरांचा इशारा, म्हणाले, 'कोणी जर गॅसचा काळाबाजार केला,तर थेट गुन्हा दाखल...'

Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्रासह देशभरातली आज 16 फेब्रुवारीच्या सर्व राजकीय, प्रशासकीय घडामोडी एका क्लिकवर

Roshan More

नागपूरचे जिल्हाधिकारी ईटनकरांचा इशारा, म्हणाले, 'कोणी जर गॅसचा काळाबाजार केला,तर थेट गुन्हा दाखल...'

नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर यांनी नागपुरात राबवलेल्या धाडसत्रांनंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवड्याबाबत मोठा इशारा दिला आहे. कोणी जर गॅसचा काळाबाजार केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.तसेच येत्या काळात धाडसत्र सुरुच राहणार आहे,असंही त्यांनी म्हटलं आहे. अन्न पुरवठा विभागाने वेगवेगळ्या भागात धाड टाकली आहे.

हवामान विभागाकडून मराठवाड्यासह विदर्भातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

महाराष्ट्रात हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मराठवाड्यातील नांदेड, बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मीरा भाईंदरमधील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उंदरानं चावा घेतलेल्या महिला रुग्णाचा मृत्यू

मीरा भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाला उंदरानं चावा घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला होता. पण आता उंदरानं चावा घेतलेल्या संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Sachin Ahir : महाराष्ट्र द्वेषी खासदाराला व्हीव्हीआयआयपी दर्शन कसं घेऊ दिलं जातं : सचिन अहीर

भीमाशंकर मंदिर गेल्या तीन महिन्यांपासून डागडुजीसाठी बंद आहे. महाशिवरात्रीला तेथील आमदारांना शासकीय पुजेचे निमंत्रण दिलं जातं. पण यावेळी कोणालाही निमंत्रण नव्हतं. मी सुद्धा शासकीय पुजेला उपस्थित राहण्याची परवनागी मागितली होती. पण त्यांनी शासकीय पूजा आणि सर्वसामान्यांचे दर्शन बंद केलेले आहे. पण जिल्हाधिकऱ्यांच्या पूजेला विश्वस्त कसे उपस्थित होते. निशिकांत दुबे यांना मंदिर बंद असताना दर्शनाची परवानगी कोणी दिली. जंगलात हेलिकॉप्टर उतरविण्यास कोणी परवानगी दिली. महाराष्ट्र द्वेषी खासदाराला व्हीआयआयपी दर्शन कसं घेऊ दिलं जातं, असा सवाल आमदार सचिन अहीर यांनी उपस्थित केला.

Rajayasabha : बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले

राज्यसभा निवडणुकीत बिहारमध्ये ट्विस्ट आला आहे. कारण महागठबंधनचे चार आमदार हे मतदानाला गैरहजर राहिले आहेत. चार आमदारांपैकी तीन आमदार हे काँग्रेसचे आमदार आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या मुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Uddhav Thackeray : धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमचा पाठिंबा : उद्धव ठाकरे

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. पण धर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला असायला पाहिजे. जोरजबरदस्तीने धर्मांतर होणार असतील तर त्याला आमचा विरोध असणाच आहे. भाजपच्या सरकारच्या काळात बळजबरीने किंवा फसवूक धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपशय कोणाचे आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray : जनतेच्या समस्या जाणूनसुद्धा तशा नाहीत, असा मानणारा मुख्यमंत्री असेल तर राज्याचे कठीण आहे : उद्धव ठाकरे

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करावी, यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. गॅस टंचाई नाही तर रांगा का लागत आहेत. मुंबईतील ३० ते ४० टक्के रेस्टॉरंट बंद झाल्याची माहिती आहे. सर्वसामान्य जनता टंचाईत होरपळत असेल त्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचत नसतील यंत्रणेत मोठा गलथानपणा आहे. जो जनेतच्या व्यथा जाणून घेत नाही आणि जाणूनसुद्धा तशा समस्या नाहीत, असा मानणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभला असेल तर राज्याचे कठीण आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Sunil Prabhu : मंत्री सभागृहात नसताना आम्ही कशासाठी बोलायचे : ठाकरेंचा आमदार विधानसभेत आक्रमक

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या चर्चेवेळी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार विधानसभेत आक्रमक झाले होते. बांधकामंत्री आणि कामगार मंत्री सभागृहात नसताना आम्ही कशासाठी बोलायचे, असा सवाल करत सभागृह स्थगित करा, अशी आक्रमक मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली.

Ajit Pawar Death Case : अजित पवारांच्या विमान अपघाताचा बिहारच्या खासदाराने राज्यसभेत विचारला प्रश्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राजदचे खासदार मनोजकुमार झा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी एआयआयबीकडून संपूर्ण घटनेचा पारदर्शक आणि सखोल तपास करण्यात येत आहे, असेही नायडू यांनी म्हटले.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपच्या नेत्यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sambhajinagar News गॅसचा काळाबाजार, संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई

संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर पुरवठा विभागानं धडक कारवाई सुरू केलीये. जिल्ह्यात 11 पथके तैनात असून, हॉटेल्स आणि गॅस वाटप करणाऱ्यांची कडक चौकशी सुरूये.आतापर्यंत 62 ठिकाणी तपासणी करण्यात आली, असून, हॉटेल आणि व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर उघड झालाय.

Uddhav Thackeray - Rahul Narwekar उद्धव ठाकरे- राहुल नार्वेकर यांची भेट, चर्चेला उधाण

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

america iran israel होर्मुझमुळे ट्रम्प एकाकी, धमकीनंतरही 4 देशांचा नकार

होर्मुझ जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्ध नौका पाठवाव्यात असं आवाहन ट्रम्प यांनी नाटोला केलं होतं... अमेरिकेला मदत न केल्यास वाईट परिणाम होण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली होती... मात्र ट्रम्प यांच्या धमकीला कुणीही घाबरलं नाही आणि 4 देशांनी स्पष्ट नकार दिला.. त्यात जपान, ऑस्ट्रेलिया, तुर्की आणि दक्षणि कोरियाचा समावेश आहे... या नकारामुळे आता ट्रम्प एकाकी पडलेत.

CM Devendra Fadnavis : बीडीडीचाळ सदनिकांचे चावी वाटप

मुंबईतील नायगाव बीडीडीचाळ पुनर्विकास प्रकल्पातील 'डॉ. बाबासाहेब आंबडेकर बीडीडी संकुला'तील एकूण ८६४ पुनर्वसन सदनिकांचे चावी वाटप आजपासून सुरू करण्यात आले. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याची सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या. यावेळी १४ सदनिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात चावी व ताबापत्र वाटप करण्यात आले.

Latur ZP News : लातूर ZP च्या अध्यक्षपदी उषा तळेगावकर

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या उषा तळेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दयानंद सुरवसे यांची वर्णी लागली आहे.

NCP SP Protest : सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

इराण युध्दामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिलिंडर काळाबाजार होत असल्याचे प्रकारही समोर आले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. मुंबईतील आंदोलनात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सहभागी झाले आहेत.

 अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे.  अंबादास दानवे यांनीच ही माहिती दिली.

बारामती पोटनिवडणुकीवर युगेंद्र पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका

"बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेञा काकींसमोर मी उभा राहणार नाही," अशी माहिती गेल्या विधानसभेत हे अजित पवार यांच्याविरोधात मविआचे उमेदवार म्हणून रिंगणात असणाऱ्या युगेंद्र पवारांनी दिली. "अजित काकांचे अपघाती निधन झालेले असल्याने ही पोट निवडणूक बिनविरोधच व्हावी, अशी बारामतीकरांची इच्छा आहे. आमच्यासह एकही प्रमुख पक्ष या निवडणुकीत उमेदवार देईल, असं आम्हाला वाटत नाही'', अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.

चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार

ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला या वर्षी 99 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर 20 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पारनेर तालुक्यातील ढवळीपूर येथे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार महाराज यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय 38) याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून गुंजाळ अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुंजाळ याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात शिवाजीनगर, पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ची चर्चा

पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर व पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ (कमी प्रदूषण क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तज्ञ संस्था आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

रत्नागिरी झेडपी अध्यक्षाची आज निवड

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार आहे. एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेला या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे आणि नेत्रा ठाकूर या महिला सदस्यांची नावे चर्चेत आहे. दरम्यान, उपाध्यक्षपदाची माळ माजी अध्यक्ष विलास चाळके यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

पुणे महापालिकेकडून जनगणना

16 मे ते 14 जून मध्ये पुणे महापालिकेकडून जनगणना होणार आहे. भारताची जनगणनाच्या पहिल्या फेरीचे कामकाज 16 मे ते 14 जून रोजी पार पडणार, पुणे महापालिका हद्दीतील 15 क्षत्रिय कार्यालय अंतर्गत जनगणना करण्यात येणार आहे.जनगणना कामकाज निर्देशानुसार १ मे ते १५ मे असा नागरिकांसाठी स्वयंगणना कालावधी असणार

सांगलीत ट्रॅव्हल्स आग, मोठी दुर्घटना टळली, प्रवाशी सुखरूप

सांगलीत ट्रॅव्हल्सला भीषण आग लागलीच्या घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक झाली असून, गाडीतील 6 प्रवाशी सुखरूप बाहेर पडलेय. दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT