Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : नागपुरात पोलीस अधिका-यावर चाकूनं हल्ला, तीन जणांना अटक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : संसदेच्या विशेष अधिवेशन, नारी शक्ती विधेयकावर होणार निर्णय, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जाहीर यासह देशासह राज्यातील महत्त्वाचे राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

Roshan More

अमली पदार्थाविरोधात धुळ्यात मोठी कारवाई

अमली पदार्थाविरोधात धुळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलिस दलाने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 7 कोटी 47 लाख रुपयांचे अमली पदार्थ शिरपूर पोलिस ठाण्यामागे पुरून नष्ट केले

सुनेत्रावहिनीं घेतले सिद्धेश्वरांचे दर्शन

बारामतीची पोट निवडणूक सुरू आहे उपमुख्यमंत्री सुनीता पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी बारामतीचे ग्रामदेवता सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

भाजप नेत्यांसह सात जणांवर गुन्हा

शेतात घुसून जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजप नेते, माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाद सोडवायला गेलेल्या पीएसआयवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात PSI सचिन वाकलेकर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

तानाजी सावंतांना पुतण्याचे आव्हान, मतदारसंघात लागले बॅनर

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे ‘भावी आमदार’ असे बॅनर झळकले आहेत. धनंजय सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धनंजय यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून बॅनरबाजी केली. नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीत काकांपासून फारकत घेत धनंजय सावंत अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले होते.

नॉट रिचेबल नगरसेविका सहर शेख वानखेडेवर

एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर त्या नॉट रिचेबल होत्या. मात्र, दोन दिवसांपासून नाॅट रिचेबल असलेल्या सहर गुरुवारी रात्री मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे,

भाजपा दंगली घडवण्याचं प्रयत्न आहे का? - यशोमती ठाकूर

उगाचचं लोकांना उचकून जाती-धर्माचं राजकारण करुन त्या ठिकाणी भाजपा दंगली घडवण्याचं प्रयत्न करत आहेत का? अमरावतीमध्ये जे झालं ते घृणास्पद झालं दुःख वाटणार आहे चिड येणार आहे आणि राग येणार आहे. पीडित महिला ह्या पीडित महिला असतात त्या कोणत्या जातीच्या किंवा धर्माचे नसते. सलोखा बिघडवण्यासाठी किंवा दंगली घडवण्यासाठी हे क्राईम नाही का मग? गृहमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत ?, असा सवाल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधी, तब्बल 34 वर्षानंतर दोन्ही देशाचे नेते भेटले

इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाल्यानंतरही इस्त्रायलने लेबनाॅन विरोधात आपली कारवाई सुरूच राहिले असे म्हटले होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा केली. लेबनॉनचे सन्मानीय राष्ट्रपती जोसेफ ऑन आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा झाली, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ही शस्त्रसंधी दहा दिवसांसाठी असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT