Maharashtra Politics sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : वरुण गांधींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; चर्चांना उधाण...

Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्रासह देशभरातली आज 17 फेब्रुवारीच्या सर्व राजकीय, प्रशासकीय घडामोडी एका क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

Varun Gandhi Meets PM Modi : वरुण गांधींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; चर्चांना उधाण...

गेल्या काही काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर असलेले भाजपचे माजी खासदार वरुण गांधी यांनी आज कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, वरुण गांधी यांचा ‘राजकीय वनवास’ अखेर संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

10 वीच्या पेपरच्या 24 तास आधीच भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला

राज्यात 10वीची बोर्ड परीक्षा सुरू असून पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस येत आहेत. यावरून खळबळ उडाली असतानाच आता सोलापुरातील सांगोल्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे 10 वीच्या भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेली आहे. स्ट्राँग रुमचं लॉक तोडून 50 प्रश्नपत्रिकांचं बंडलच चोरून नेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून उद्या (ता.18) 10वी भूगोलचा पेपर होणार आहे. त्याआधीच पेपर फुटल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

धुळे जिल्ह्यात पुरवठा विभागातर्फे 31 गॅस सिलेंडर वरती जप्तीची कारवाई

धुळे जिल्ह्यामध्ये अवैधपणे घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी वापर करणाऱ्या विरोधामध्ये पुरवठा विभागातर्फे आक्रमक भूमिका घेतली जात असून, आता पुरवठा विभाग यासंदर्भात ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे, कारण धुळ्यामध्ये मागील दोन दिवसांमध्ये जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पुरवठा विभागातर्फे छापेमारी करण्यात आली आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी घरगुती गॅसचा वापर हा व्यवसायिक कामासाठी केला जात असल्याचे आढळून आले, असे जवळपास 31 गॅस सिलेंडरची जप्तीची कारवाई पुरवठा विभागातर्फे करण्यात आली आहे,

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे दोन गटात हाणामारी, दोन्ही गटातील 17 लोकांवर गुन्हा दाखल

बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे जुन्या वादातून दोन गटात काही दिवसांपूर्वी लाकडी दांडे आणि दगडाने हाणामारी झाली होती. या मारहाणीत वृद्ध व्यक्तीसह महिला देखील जखमी झाल्या त्यांच्यावर गेवराई येथील शासकीय रुग्णाला तो उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता त्याची काही व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूचा फिर्यादीवरून एका गटातील आठ तर एका गटातील नऊ अशा एकूण 17 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

जालन्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी आणि 2025 चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत गोदावरी नदीच्या पात्रात उतरून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत तब्बल 90 टक्के शेतकरी वंचित राहणार राहणार असल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलनास केला आहे.

धक्कादायक! ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतीगृहात भ्रष्टाचार; जास्त विद्यार्थी दाखवून लाटला करोडोंचा निधी

बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या हंगामी अनिवासी वसतीगृहात जास्त विद्यार्थी दाखवून करोडो रुपये उचलण्यात आले आहेत. विद्यार्थी संख्या दुप्पट, तिप्पट वाढवून निधी उचलला गेला तर एका ठिकाणी वसतीगृह नसताना निधी उचलल्याची सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मस्के यांनी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वाद थेट रत्नगिरी शहर पोलीस ठाण्यात

अमेरिका आणि इस्त्रायल–इराण यांच्यातील संघर्षाचा भडका उडाल्यानंतर याचे चटके आता महाराष्ट्रात बसू लागले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे वितरण विस्कळीत झाले असून ग्राहक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. दरम्यान कोकणातील रत्नागिरी शहरात रत्नागिरी गॅस एजन्सीने कर्मचाऱ्यांवर सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा आरोप केल्याने वादाचा भडका उडाला आहे. येथे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून सकाळी 8.30 वाजल्यापासून 14 कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. कंपनी मॅनेजमेंटने व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण करताना कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा आरोप करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तर आम्ही पावतीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता हा वाद रत्नागिरी पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून सर्व कर्मचारी रत्नागिरी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले आहेत.

नाशिकमध्ये 500 गॅस सिलेंडरचा साठा जप्त, गॅस माफियांचा डाव उधळला

नाशिकमध्ये 500 गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला असून गॅस माफियांचा डाव सातपूर पोलीस आणि पुरवठा विभागानं कारवाई करत उधळला. निवासी भागात एचपी कंपनीतून आलेला 500 हून अधिक सिलेंडरचा ट्रक नागरिकांच्या निदर्शनास आला. 500 हून अधिक सिलेंडरचा गोदामात न नेता काळ्या बाजारात डाव असल्याचा संशय नागरिकांना आला होता. याची माहिती सातपूर पोलीस आणि पुरवठा विभागाला देण्यात आली. ज्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कारवाई करत ट्रक, रिक्षांसह चालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेतलंय. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

मुंबई–पुणे प्रवाशांसाठी दिलासा; शिरूरसाठी नवा पर्यायी महामार्ग

मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिरूर परिसरात नवीन पर्यायी महामार्ग उभारण्याची योजना आखली आहे. यामुळे सध्या होत असलेली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाची माहिती शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शिंगणापूर जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर

काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी शिंगणापूर जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटील आणि तर उपाध्यक्ष पदासाठी असळज जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी पाटणकर यांची उमेदवारी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनंती आल्यास बिनविरोध निवड होईल काँग्रेस नेत्यांची भूमिका

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून भाजपचे मुडशिंगी जिल्हा परिषदेचे सदस्य तानाजी पाटील यांचे नाव निश्चित.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिल्पा शशिकांत खोत यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव निश्चित


कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिल्पा शशिकांत खोत यांचे नाव निश्चित झाले आहे. काल दिवसभर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शोभाताई फराकटे आणि शैलेजा पाटील यांची नावे चर्चेत होती. अखेर खोत यांची निवड करण्यात आली असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपद कागलमध्येच ठेवण्यात यश मिळवले.

तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अबू-दाबी येथे तेल निर्मिती केंद्रावर हल्ले सुरु 

Kolhapur: आज कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड आज होणार आहे. दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड होईल.

Pune Collector : सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक

घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT