महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : अटक केलेल्या भोंदूबाबाचे केसरकर, तटकरे, चाकणकर भक्त; सुषमा अंधारे यांचा दावा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्रासह देशभरातली आज 18 फेब्रुवारीच्या सर्व राजकीय, प्रशासकीय घडामोडी एका क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare : भोंदूबाबाचे केसरकर, तटकरे, चाकणकर भक्त...

कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. खरात याच्यावर बलात्कार, यौन शोषण यासारखे आरोप आहेत. यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली आहे.

सांगली ब्रेकिंग : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अर्ज भरण्याची प्रकिया पूर्ण

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांनी अध्यक्षपदाचा अर्ज केला दाखल; तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या ऋषिकेश पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

भाजपाकडुन अध्यक्ष पदासाठी स्वप्नाली मासाळ यांनी दाखल केला अर्ज,

तर उपाध्यक्ष पदासाठी कामेरी गटाचे जयराज पाटील यांनी दाखल केला अर्ज

तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी डॉ. शितल बाबर यांचा, तर उपाध्यक्ष पदासाठी हिम्मत जाधव यांचा अर्ज दाखल

1 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची आहे मुदत, यातील कोण अर्ज माघारी घेणार याकडे लक्ष

सांगली ब्रेकिंग; सांगलीत अध्यक्ष निवडीत मोठ्या घडामोडी

सांगलीत अध्यक्ष निवडीत मोठ्या घडामोडी

भाजप अध्यक्ष पदासाठी दावा केला असताना शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नागेवाडी जिल्हा परिषद सदस्य शीतल बाबर या अध्यक्ष पदासाठी

तर भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी जयराज पाटील.

संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्वराज्याचे रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वढू येथे समाधीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. तुळापूर येथील बलिदानस्थळीही त्यांनी अभिवादन केले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून आदर व्यक्त केला आणि स्मरण केले.

सांगली ब्रेकिंग : महाविकास आघाडीकडून कासेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी

महाविकास आघाडीकडून कासेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे कुंडल जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड यांना उमेदवारी. सांगली जिल्हा परिषदेत अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य येण्यास सुरुवात झाली आहे. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गटाचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सदस्य अभिजीत पाटील जिल्हा परिषदेत अर्ज घेण्यासाठी दाखल. दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा पार पडणार आहे.

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 21जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्वीकृत नगरसेकांची आज निवड

पुणे महापालिकेच्या आज सभेत स्वीकृत नगरसेकाची निवड केली जाणार आहे. 10 नगरसवेक निवडले जाणार आहेत. मात्र. दोन जणांचे कागपत्र अपूर्ण असल्याने त्यांचे अर्ज बाद झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने यावर अधिकृत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे महासभेतच वास्तव समोर येणार आहे.

अॅसिड हल्ल्या प्रकरणी वडगावपानचे गावकरी आक्रमक, रास्ता रोको

अहिल्यानंगर जिल्ह्यातील संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याविरोधात वडगावपान गावचे गावकरी आक्रमक झालेत. त्यांनी आज रास्तारोको आंदोलनाची हाक दिलीय. आरोपीला पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी गावकऱ्यांनी दिली आहे.

'म्हाडा'च्या सदनिकांमध्ये १५४ कोटींचा घोटाळा, भाजप नेता रडारवर

नाशिक महापालिका हद्दीत म्हाडाच्या वीस टक्के सदनिका शासनाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र 49 प्रकल्पांमध्ये यात मोठा घोटाळा झाला आहे. 154 कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजप सह अन्य राजकीय पक्षांचे काही नेते गुंतले असल्याचे पुढे आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. दरम्यान, भाजपने मुळशी तालुक्यातून माण हिंजवडी गटातून विजयी झालेले जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT