Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : केसरकरांकडून काही चुकीचे घडले असेल तर एकनाथ शिंदे निर्णय घेतील - भरत गोगावले

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 March 2026 : Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा मोठा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. यासह आजच्या दिवसभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात 

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाली आहे.

रोहित पवारांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सुचवली चार नावे

रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा!,

रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा - रुपाली ठोंबरे

रुपाली चाकणकर या अशोख खरात या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेट प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनीच पोलिसांवर दबाव आणून अशोख खरातला वाचवले. त्यामुळे चाकणकर यांना सहआरोपी करा, असे पत्र रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात चोरीची घटना

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातील चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यानेच या दानपेटीतील पैसे चोरल्याचं समोर आलं आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी आरोपीला लगेच बेड्या ठोकल्या आहेत.

रुपाली चाकणकर राज्यातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार - रूपाली ठोंबरे पाटील

रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. शिवाय त्यांना खरात प्रकरणात चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित केली आहे.

दीपक केसरकर यांची SIT चौकशी करा - विनायक राऊत

अशोक खरात प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांनी आमदार दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

चाकणकरांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितला - रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. चाकणकर आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यातील संबंधांवरून लोकांमध्ये वातावरण चांगलं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, असं आठवले यांनी म्हटलं.

Pune News: पुण्यातील स्वामी नारायण मंदिराच्या परिसरातील दरी पुलावर मोठा अपघात

पुण्यातील स्वामी नारायण मंदिराच्या परिसरातील दरी पुलावर अनेक चारचाकी वाहनांचा रविवारी पहाटे अपघात झाला आहे. पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे.

केसरकरांकडून काही चुकीचे घडले असेल तर एकनाथ शिंदे निर्णय घेतील - भरत गोगावले

अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आता खरातशी जवळीक असल्याने दीपक केसरकर यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्याकडून काही चुका घडले असतील तर याबाबतचे धोरण एकनाथ शिंदे ठरवतील, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT