Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : नंदुरबारमध्ये इंधन टंचाईच्या अफवेनं नागरिकांच्या लांब रांगा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 24 March 2026 : अशोक खरात प्रकरणी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज निवेदन देणार आहेत.आज खरात याची पोलीस कोठडी संपणार आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मंगळवार 24 मार्च रोजीच्या दिवसभरातील विविध राजकीय, प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Nandurbar Petrol Shortage नंदुरबारमध्ये इंधन टंचाईच्या अफवेनं नागरिकांच्या लांब रांगा

नंदुरबार जिल्ह्यात इंधना टंचाईच्या अफवेनं पेट्रोल पंपावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केलीये. काल रात्रीपासून अफवा पसरल्यानं वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्याय. अचानक गर्दी वाढल्याने वाहनधारकांना कमी प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच वितरण केल जात असून, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालेय.

सिद्धिविनायक मंदिरात कर्मचाऱ्याचा तिजोरीवर डल्ला, सीसीटीव्ही फुटेजमधून फुटलं बिंग

सिद्धिविनायक मंदिराच्या पुजारी कक्षातील दानपेटीतून १० हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका कर्मचाऱ्यानेच ही चोरी केली. गेल्या ८ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपी कर्मचाऱ्याने गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

मुंबईत भाजप पदाधिकाऱ्याचा मोठा राडा; ऑफिस फोडलं व्हिडिओ समोर

वडाळ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचे कार्यालय फोडले. वडाळा येथे भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचं कार्यालय अज्ञातानी फोडले असून गुढीपाडव्याला या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. कार्यालय अज्ञातानी का फोडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशीला सुरुवात कार्यालयाबाहेर फुटलेल्या काचांचा खच झाला आहे.

सातारा जिल्हा परिषद सभापती-उपसभापती निवडणुकीत राडा ही लोकशाहीची हत्या: सुप्रिया सुळे 

Ratnagiri News: ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतीमधील रिक्त १७४ पदांसाठी ही निवडणूक २८ एप्रिलला होणार आहे.

पोलीस हवालदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

कौटुंबिक वादातून नैराश्यात आलेले पोलीस हवालदार जयवंत झाडे यांनी घरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरात घडली. .ते सध्या वाठोडा पोलिसात कार्यरत आहे.

कँप्टन अशोक खरात प्रकरणात खरात आणि सनदी अधिकाऱ्यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. खरात याने नाशिक परिसरात बेहिशेबी मालमत्ता असल्याचे समजते.

कोलंबियात हवाई दलाचे विमान कोसळले! ६६  व्यक्ती यात ठार झाले आहेत. अनेक जखमी असून  मृतांमध्ये जवानांची संख्या अधिक आहे.

Donald Trump : युद्ध थांबणार? ट्रम्प यांचे लष्कराला आदेश

आखातात सुरू असलेले युद्ध थांबणार असल्याची चिन्ह आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. .सोबतच 9 एप्रिलला युद्ध संपवण्याची तयारी असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 5 दिवसांसाठी पुढे ढकला असे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला दिले आहेत.

Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्चला

धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार आहे.

US Iran War Update : युद्ध थांबवण्याची डेडलाईन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली आणि संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानच्याऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच काही तासांनी त्यांनी थेट युद्ध संपवण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. याबाबतची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली असून या माध्यमांच्या दाव्यानुसार अमेरिकेने युद्ध थांबण्यासाठी ९ एप्रिल ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे.

Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पवार नागपूरला जाणार आहे.

भोंदू अशोक खरातची एसआयटीकडून (SIT) सोमवारी तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी अशोक खरातची स्वतः चौकशी केली. यावेळी त्यांनी खरातकडून इतर गुन्ह्यांचेही जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती आहे. आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे अशोक खरातला दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT