Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Breaking LIVE : बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 April 2026:राज्यभरासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

सरकारनामा ब्यूरो

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेला जामीन मंजूर

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मागील पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बडतर्फ PSI गोपाळ बदने याला अखेर जामीन मंजूर झाला आहे.

खासदार राघव चड्ढा यांनी एक्सवर शेअर केला भाषणांचा व्हिडिओ

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्या पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याला काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे.

काल पुण्यात 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद

पुण्याला काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे पुणेकरांना चक्क पाण्याखाली गेलेल्या रस्ताने प्रवास करावा लागला. अनेकांना या अवकाळी पावसाचा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आता कालचा हा मुसळधार पाऊस पुण्यात तब्बल 130 वर्षांनी पडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 130 वर्षानंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर काल पुण्याच 65 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय आहे.

Sansad budget Session : संसद अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू होणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा सुरू होणार आहे. त्यावेळी लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरून 816 करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेण्याचा आणि महिलांच्या राखीव जागांचा कायदा लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न असणार आहे. १६ ते १८ एप्रिल यादरम्यान अधिवेशन होणार आहे.

पुण्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी बोलावली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवतिर्थ येथे बैठक

Satish Bhosale Acquitted: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या (Khokya) तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण या बरोबरच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT