अकोल्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची निघाली धिंड... अकोला पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केली आहे. गेल्या 4 महिन्यात अकोला पोलिसांनी विविध ठिकाणी टोळीनं गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा 'रोड शो' केलाये. अशातच आजही अकोला पोलिसांनी कौलखेड भागात भरदिवसा धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांची धिंड काढली
बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा तापले आहे. चिखलीचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली असून, आपली राजकीय निष्ठा स्पष्ट करताना त्यांनी महिलांचा नामोल्लेख करताना वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी, जी कुणी महिला असते... जीला दाखवाव लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते, असे म्हटले आहे. यामुळे आता वाद सुरू झाला आहे.
मेळघाटमध्ये ग्रामीण पानी पुरवठा विभाग पेयजल जलजीवन मिशनमध्ये 100 कोटींच्यावर प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे. त्यांनी या भ्रष्टाचारची केंद्रीय समिती मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर 'हर घर नल, नल में है जल', ही पंतप्रधान मोदी यांची संकल्पना पूर्ण पणे फेल गेल्याचा आरोपही केला आहे.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी गरज पडल्यास राहुल गांधींची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबतचा महाविकास आघाडीतील तीन मित्रपक्षांची बैठक झाली. त्यामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत या जागेबाबतचा निर्णय होणार आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा दावा कायम आहे. त्यामुळे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोमवारी (६ एप्रिल) राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. त्यांची नुकतीच महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यासाठी रविवारी दुपारीच दिल्लाला मुंबईतून रवाना झाले.
भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात सध्या कोणत्याही पक्षाचा आमदार, नेता नाही. मुळात पक्षाला सध्या कोणाची गरज नाही. त्यामुळे भाजपला पक्ष फोडण्याची गरज वाटत नाही, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
जैन मुनी नीलेशचंद्र यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली होती. ते मुनी नाही तर मुनीर आहेत, असं म्हटलं होतं. त्याला जैन मुनी नीलेशचंद्र यांनी उत्तर दिले आहे. मी मुनी आहे, मुनीर नाही. मी तर धर्माचे काम करतो. राणीसाहेबांवर चुकीची टिपण्णी करणाऱ्याला तुम्ही काय बोलत नाही. फटका त्याला मारा. मी तर सनातनी आहे. मी गोरक्षणाचे काम करतो. जरांगे पाटील यांना काही तरी गर्व झाला असेल फटके मारायचे असतील तर मुंब्य्राला हिरवा करणार, असं म्हणणाऱ्यांना मारा, असे आव्हान दिले.
इराण-इस्त्राईल युद्धामुळे कांदाची निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्याचा फटका निर्यातीलाही बसला असून यंदा कांद्याची निर्यात ३५ टक्क्यांनी घटली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर शहराध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात स्टॅडिंग वॉरंट निघालं आहे. पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कळमकर यांच्याविरोधात २१ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ते फेब्रुवारीपासून फरार आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी पथक करत आहे. दरम्यान अशोक खरातने अनेकांची फसवणूक करुन कोट्यावधींची माया जमवली आहे. याप्रकरणात आता ED ची एण्ट्री होणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना दिले आहे. याप्रकरणाची ईडी चौकशी होणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सनातन हिंदू संस्कृतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं. त्यांच्या मते, जगातील सर्वात प्राचीन संस्कृती ही आपली साधू-संतांची संस्कृती आहे. फडणवीस म्हणाले, संस्कृतीच्या पुढे जाण्याचे श्रेय साधू-संतांना मिळते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय. सनातन संस्कृती अशी आहे की, तिची कालगणना कोणीही मोजू शकत नाही.
अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी VSR कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. दरम्यान जय पवारांच्या मागणीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दुजोरा दिला आहे. जय पवारांची मागणी तीच राष्ट्रवादीची मागणी असं तटकरेंनी म्हटलयं. अपघाताचं सत्य देशाला कळलं पाहिजे असं तटकरे म्हणालेत.
बारामतीत काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असून त्यांच्या उमेदवाराचा फारसा परिणाम होणार नाही, असा टोला भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला लगावला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर राहुरीवर आमचाच दावा असल्याचे ठामपणे सांगितले. मविआतील नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. काल प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली असून आज ते जयंत पाटील यांच्याशी बोलणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
राहुरी विधानसभा मतदारसांच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे दाखल झाले असून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतही या बैठकीला येण्याची शक्यता आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार आहे. काँग्रेसने उमेदवार देऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना विनंती करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत.
जैन मुनी नयन पद्मसागर यांनी छत्रपती ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच जैन मुनी नीलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजप नेते नीतेश राणे यांच्याशी केली आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जैन मुनींचा खरपूस शब्दात समाचार घेतल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील घणाघात केला. महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास पुसण्यासाठी मुनी-बाबांना सुपाऱ्या दिल्यात का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजची समुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अथवा शांतता करारासाठी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. एवढेच नाही तर, असे न झाल्यास इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याची धमकीही दिली आहे. मात्र इराणने ट्रम्प यांची धमकी थेट धुडकावून लावली आहे. ट्रम्प यांच्या 48 तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी बोंद्रे यांच्या फोटोला चपला व जोडे मारत संताप व्यक्त केला. या आंदोलनात महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेविका तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
अशोक खरात 'हवाला' रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता. मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे 25 हजार रुपये इतके होते. वर्षाचे 365 दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात असल्याचे तपासात समोर येत आहे.
राज्यभरात सध्या नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण गाजत असतानाच आता नवी मुंबईतही असाच एक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील कळंबोली भागात असणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी दोन महिलांनी या भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांच्या प्रकरणाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता इथल्या समता पतसंस्थेत 100, तर सिन्नरच्या कुंदेवाडी इथल्या जगदंबा पतसंस्थेत 32 खाती असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी या खात्यांमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती दिली.
तेलंगणामधील आमदार टी. राजा सिंह यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या विधानांचे समर्थन करत त्यांनी राज्यातील अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची आणि औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची मागणी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ असा टोला वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही’, असे वक्तव्यही त्यांनी केले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती जोमाने कामाला लागले आहेत. "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत कोणीही पश्चिम बंगालला बांगलादेश बनवू शकत नाही" असं म्हणत मिथुन यांनी 'एसआयआर' आणि मतदार यादीतील वादावरून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात आलेल्या LLB 3 Year CET परीक्षेत 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ट्रम्प यांनी या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी नेते ठार झाल्याचा दावा केला आहे.
TV आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत TV आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू असतानाच सुनील तटकरे सोलापूर दौऱ्यावर आले असून ते आज देवदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रात एसआयआर सर्वेक्षणाच्या नावाखाली तब्बल २ कोटी ९० लाख मतदार कमी होतील. या मतदारांची नावे वगळली तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकांच्या निकालावर होऊ शकतो, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.