Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार

Political Breaking Live Marathi Headlines Updates : बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासह आज दिनांक ६ एप्रिल रोजीच्या देशासह राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

लक्ष्मण हाके यांची निवडणुकीतून माघार

लक्ष्मण हाकेंची बारामती निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. हाकेंनी माघार घ्यावी यासाठी दत्ता भरणेंनी हाकेंची भेट घेत त्यांना विनंती केली होती. अखेर हाकेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी सकाळीच काटेवाडीत अजित पवारांच्या आईंचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अजितदादांच्या स्मृतीस्थळी जात त्यांनी अभिवादन केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता.आहे

फडणवीसांनी बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न मोडला- संजय राऊत

राज्यात पोटनिवडणूक बिनविरोध निवडणुका होत होत्या. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी हा पॅटर्न मोडला. त्यांना आम्ही विनंती केली होती की उमेदवार देऊ नका. मात्र, त्यांनी तेव्हा उमेदवार दिले. आणि आता बिनविरोधसाठी आवाहन करतायेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

जहीर शेख विरोधात गुन्हा

भिगवन प्रकरात मुलीच्या जबाबानंतर जहीर शेखसह चौघांविरोधात अपहरण आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी तरुणीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचे जबाब दिला होता. मात्र आता मुलीने तिचा जबाब बदलला आहे.

उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बारामतीमध्ये आकाश मोरे यांनी काँग्रेसकडून उमदेवारी दाखल केली आहे. तर, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही हे स्पष्ट झाले नाही.

पार्थ पवार हे 9 एप्रिलला खासदारकीची शपथ घेणार

ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे रामराव वडकुते आणि माया ईवनाते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे हे सर्व नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य आज खासदारकीची शपथ घेणार आहेत. तर दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे 9 एप्रिलला शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते, ज्योती वाघमारे या नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

सुनेत्रा पवार अर्ज दाखल करण्याआधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार

सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी अभिवादन करणार.

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दुपारी १२.३० वाजता त्या आपला अर्ज दाखल करतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT