Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे रुग्णालयात दाखल

Political Breaking Live Marathi Headlines Updates : बारामती-राहुरी पोटनिवडणूक अपडेट, अमेरिका-इराण युद्धा थांबले, दोन आठवडे हल्ले करणार नाही, ट्रम्प यांची घोषणा यासह राज्यातील राजकीय, राज्यासह देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी जाणून घ्या....

Roshan More

देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलं - समरजीत घाटगे

हसन मुश्रीफ आणि माझ्यातले वैर संपलं आहे आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते संपवलं आहे आणि येत्या काळात देखील आम्ही सोबत काम करू, असं वक्तव्य समरजित घाटगे यांनी केलं आहे.

माढा तालुक्यात रात्रीत उभारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

माढा तालुक्यातील मोडनिंब मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्रीत उभारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत समोर नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. त्याच्या कायदेशीर बाबींचा गोंधळ सुरु असतानाच अचानकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच परिसरात उभा केला गेला आहे.

RBI कडून रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम, व्याजदर जैसे थे, बदल नाहीच

सुषमा अंधारे रुग्णालयात दाखल

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत.

बारामती पोटनिवडणुकीत 53 उमेदवार

बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. गुरुवारी (ता.9) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोण कोण माघार हे हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

सुनेत्रा पवार शनिवारी फोडणार प्रचाराचा नाराळ

बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी तब्बल 55 उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याची आशा मावळली आहे. बारामती विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून सुनेत्रा पवार या शनिवारी नारळ कन्हेरीतील मंदिरात प्रचाराचा नारळ फोडतील.

मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे सिमलेस जाळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात  मेट्रोचे जाळे तयार करून  सिमलेस वाहतूक व्यवस्था तयार करण्याचे काम  सुरू आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षात मुंबई महानगर क्षेत्रात   दिल्लीपेक्षाही मोठे वाहतुकीचे जाळे निर्माण होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड येथे दिली. मिरा भाईंदरच्या दहिसर ते काशी गांव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या मेट्रोमुळे मिरा भाईंदरला मुंबईशी जोडण्याचे काम  झाले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात इच्छा मृत्यूला मंजुरी

राज्यात आता इच्छा मृत्युपत्राचा ऐतिहासिक निर्णय लागू करण्यात आलाय. दुर्धर आजाराला तोंड देणाऱ्या व्यक्तींना इच्छा मृत्युपत्राला मान्यता देण्यात आलीये. सर्वोच्च न्यायालयानं इच्छा मृत्युपत्रांचे संरक्षक म्हणून महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषद किंवा नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली असून, मृत्युपत्राच्या नोंदणीसाठी स्वतंत्र संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे.

अमेरिका-इराण शस्त्रसंधी, पाकिस्तानची यशस्वी मध्यस्थी

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तुर्तास थांबला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अखेर आपण सध्या हल्ले करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.ट्रम्प यांनी यांनी जाहीर केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या आवाहनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने यशस्वी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT