सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे तब्बल 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी जेलबाहेर येणार आहे. त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे.
अजित पवार यांचा लहान मुलगा जय पवार हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत जय पवार VSR या कंपनीबाबत गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार आहे. निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी जयराम चाटेला न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रोटोकॉलचे पालन न केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर ममता बनर्जींनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रपती सचिवालयाने मंजूर केलेल्या अधिकृत कार्यक्रमसूचीमध्ये मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्र्यांना उपस्थित राहण्याची कोणतीही अट नव्हती. तसंच हा कार्यक्रम 'आंतरराष्ट्रीय संथाल परिषद' या खाजगी संस्थेने आयोजित केल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालला गेल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जींकडून राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली आहे.
सायबर भामट्यांना रोखण्यासाठी विविध उपाय सातत्याने केले जात आहेत. मात्र हे प्रबोधन पुरेसे ठरत नाही असे चित्र दिसत आहे. विशेषत: नाशिकमध्ये फसवणुकीच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड देण्यासाठी आलेल्या फोनवरून व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी संबंधितांचे बँक खाते हॅक करण्यात आले. त्यातून तिघांना ३१.४२ लोखांचा गंडा घालण्यात आला आहे. नाशिक शहर हे सायबर भामट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. गेल्या दोन वर्षात सायबर ठगांनी १११ कोटींना गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक आहे.
भाजपाने जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी भाजपला लगावला आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारलं मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असे देखील ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
मुळशी तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी ९ मार्च रोजी निवडणूक होत आहे. चायत समितीमध्ये सहा जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजय झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. आणि भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहेत.
पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला एक एक स्वीकृत नगरसेवक पद येणार आहे. या पदासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणी करण्यात येत आहे.दिल्ली दरबारी नेत्यांशी स्थानिक नेत्यांचा संपर्कात आहे. एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 68 अर्ज आले आहेत. राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या तीन नेत्यांकडून अहवाल प्रदेश कार्यालयात पाठवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.