Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू

Political Breaking Live Marathi Headlines Updates : बारामती-राहुरी पोटनिवडणूक अपडेट, इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू, सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन यासह राज्यातील राजकीय, राज्यासह देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी जाणून घ्या....

सरकारनामा ब्यूरो

तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन

बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांचे अपघाती निधन. ते मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे होते. लातूर-अंबाजोगाई मार्गावर त्यांच्या काराला भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

शिर्डी पोलिसांना हवाय खरातच ताबा

शिर्डीतील बेकायदेशीर सावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा चौकशीसाठी ताबा मिळावा, यासाठी शिर्डी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच याच गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी पसार असलेली खरात याची पत्नी कल्पना हिने सत्र न्यायालयात वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर उद्या दहा एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

रोहित पवार हर्षवर्धन सपकाळांना भेटले

काल सुनेत्रा पवारांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली. बारामतीमधील निवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी विनंती रोहित पवारांनी सपकाळांना केली आहे.

सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन

सुनेत्रा पवार यांनी बुधवारी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी विनंती केल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतून निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याने हायकमांडशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितल्याची चर्चा आहे.

खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने निवडणूक याचिका फेटाळली

अहिल्यानगर (त्यावेळचा अहमदनगर) लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयासोबतच न्यायालयीन लढाईतही लंके यांनी आपली बाजू भक्कम सिद्ध केली आहे.

इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू

बुधवारी अमेरिका आणि इराणने शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर इस्त्रायलने इराणसोबतचे युद्ध थांबवले मात्र, लेबनॉनवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात लेबनॉनमधील 254 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एक हजार पेक्षा अधिक गंभीर जखमी झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT