Maharashtra Live Updates sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज सोमवार, दिनांक 9 मार्च 2026 रोजीच्या राज्यासह देश आणि जगभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

'एवढे निर्दयी पालकमंत्री कसे?' बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा शेवटचा दिवस

बच्चू कडू यांच्या 250 किलोमीटर मेळघाट संघर्ष यात्रेचा आज शेवटचा दिवस असून सरकारने दखल न घेतल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. नऊ दिवसांमध्ये पालकमंत्र्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, मुख्यमंत्री पालकमंत्री विदर्भातील असून सुद्धा त्यांनी कोणती दखल घेतली नाही, आमची साधी विचारपूसही केली नाही एवढे निर्दयी पालकमंत्री कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मेळघाट मधील लोकांना आतापर्यंत पिण्याचे पाणी मिळालं नाही त्यांना वीज नाही, शिक्षण नाही, गावात रस्ते नाही, त्यांच्या मका पिकाला भाव नाही हे मेळघाट मधील आदिवासी हिंदू नाहीत का? असेही त्यांनी म्हटलं आहे.

सीसीटीव्हीच बंद, कॉपीचा पाऊस; बीडमध्ये पुन्हा एकदा झेरॉक्समधून कॉपीचा प्रकार उघड

सध्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून या परीक्षांमध्ये थेट शिक्षकच उत्तर पत्रिका तयार करत आहेत. तेच विद्यार्थांना झेरॉक्समधून कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार येथे सुरू आहे. हा प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील रायमोह येथील जालंदर विद्यालयात उघडकीस आला असून कॉपीसाठी शिक्षकच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असल्याचे समोर आले आहे. तर बोर्डाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक सेंटरवर बसवले सीसीटीव्हीच बंद केले जात आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

घोटाळेबाज इन्स्पेक्टर महिन्यापासून बेपत्ता, एक कोटी १६ लाख रुपयांचा अपहार करून फरार

जळगाव जिल्हा पोलिसांच्या पेट्रोल पंपाच्या व्यवहारात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच मोठा घोटाळा केला. एक महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला. एक कोटी १६ लाख रुपयांचा अपहार झाल्याच्या उघड झाले. दरम्यान आता हा घोटाळा पोलीस अधिकाऱ्यानेच केल्याचे समोर आले असून पंपाचा व्यवहार पाहणारे पोलीस निरीक्षक वाल्मीक वाघ फरार आहेत. अद्याप ते पोलिसांच्या हाती लागले नसून जळगावच्या पोलीस यंत्रणेलाच आव्हान निर्माण झाले आहे.

अमेरिका इजरायल आणि इराणच्या युद्धाची झळ, सोन्या चांदीच्या दरात घसरण  

अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धाची झळ जगाला बसत असून आता याचे परिणाम सोने आणि चांदीच्या दरात होताना दिसत आहे. एकाच आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. शनिवार आणि रविवार बाजारपेठ बंद असल्याने आज सोमवारी बाजारपेठ उघडताच सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण नोंदवली आहे. सोने एसटी शिवाय १६१००० वरून १५९५०० वर आले असून चांदीचे दर जी एसटी शिवाय २६८००० हजारावरून २६६००० वर खाली आले आहेत.

सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट; भाजपचे मंत्र्यांचा मोठा दावा,  पण आमदाराने कोंडीत पकडलं

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितींच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 16 मार्च पंचायत समितीचे सभापती आणि 20 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना आला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या सदस्यांना टूरवर पाठवत गेम खेळला आहे. दरम्यान भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी तिसऱ्यांदा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार असे संकेत दिले आहेत. पण कराड उत्तरच्या आमदाराने भाजप नेत्यांनाच कोंडीत पकडत कराड पंचायत समितीच्या सभापती पदावरून भाष्य केलं आहे. यामुळे झेडपी अध्यक्ष निवडीत पुन्हा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. माझी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राकेश कामठे यांना संधी देण्यात आली असून काँग्रेसने एका जागेवर कामगार नेते सुनील शिंदे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे.

अमरावती पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; तब्बल 3 कोटी 1 लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

अमरावतीत पोलिसांनी मोठा सर्जिकल स्ट्राईक केला असून तब्बल 3 कोटी 1 लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त केले आहे. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत 2 किलो 80 ग्रॅम मेफेड्रोनसह दोन आरोपींना अटक केली आहे. अब्दुल फहीम आणि शेख आयान अशी आरोपींची नावे आहेत.

पुणे भाजपकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

भाजपकडून पुणे महापालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नावे पुढील प्रमाणे

राजेंद्र काकडे

उदय लेले

विश्वास ननवरे

प्रियांका शेंडगे

रविंद्र साळेगावकर

जयप्रकाश पुरोहित

निलेश कोंढाळकर

काँग्रेसच्या पदयात्रेस सुरुवात

काँग्रेसने शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारीच्या विरोधात पदयात्रा काढली आहे कळमनुरी ते हिंगोली असा 18 किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा सायंकाळी हिंगोली शहरात दाखल होणार आहे .

पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचे अभिनंदन

टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा संघाचा पराभव करत भारतीय संघाने पराभव करत इतिहास रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन करताना खास ट्विट केले आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकत भारतीय संघाने सिद्ध केले आहे की, दृढ़निश्चिय, संकल्प, संयम आणि आत्मविश्वासचा संगमच यशाचा मुलमंत्र आहे. हा विजय आपल्याला सांगतो की, योग्य दिशेने केलेल्या कठोर परिश्रमामुळे ध्येय साध्य करता येते. नक्की मिळते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून भारतीय संघाचे अभिनंदन

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Pune live: 2 सिलिंडरमधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांवर

केवायसी नसेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाही, अशी भूमिका पुण्यात प्रशासनाचे घेतली आहे. 2 सिलिंडरमधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांवर करण्यात आले आहे.

Latur: लातूरमध्ये पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची आजनिवड

लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समिती असून आज दुपारी या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील लातूर आणि जळकोट पंचायत समितीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने या ठिकाणी काँग्रेसचा सभापती होणार आहे. तर औसा ,निलंगा आणि देवणी या पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाल्याने भाजपाचा सभापती होणार आहे.

आज (9 मार्च) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हा खास दिवस आहे. या निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा आज मेळावा आहे.

जय पवार यांची पत्रकार परिषद पुढे ढकलली

Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांपाठोपाठ अजित पवारांचे लहान सुपुत्र जय पवारही अॅक्टिव्ह झाले आहेत. अजित दादांच्या मृत्यूप्रकरणी जय पवार आज पत्रकार परिषद घेणार होते, पण ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. रांच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT