Uddhav Thackrey & Raj Thackerey Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Updates : उद्धव ठाकरेंच्या वाहनांचा ताफा 'शिवतीर्थ'समोरून; राज ठाकरेंची वाहने थांबून राहिली...

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Rajanand More

Uddhav-Raj Thackeray News : ठाकरेंचा ताफा समोरासमोर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज हिंदी सक्तीच्या जीआरची आझाद मैदान परिसरात होळी करण्यात आली. यावेळी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंच्या वाहनांचा ताफा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ'समोरून गेला. यावेळी राज ठाकरेंचा ताफा रस्त्याच्या एका बाजूला थांबला होता. कुठेही न थांबता उद्धव ठाकरेंचा ताफा तिथून निघून गेला.

Uddhav Thackeray News : जीआरची होळी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे व इतर नेत्यांनी एकत्रित येत रविवारी मुंबई हिंदी सक्तीच्या जीआरची होळी केली. तसेच पक्षाच्यावतीने राज्यात अनेक ठिकाणी या जीआरची होळी करण्यात आली आहे. ठाकरेंनी पहिल्यांदाच त्रिभाषा धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग घेतला.

Shiv sena News : विलास शिंदे शिवसेनेत

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी रविवारी आपल्या समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंनी नुकतीच विलास शिंदे यांची उचलबांगडी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे आझाद मैदानात दाखल, हिंदी सक्तीच्या जीआरची होळी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हिंदीची पहिलीपासून अंमलबजावणी करण्याच्या जीआरची होळी करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

Jitendra Awhad News : जमील शेख हत्या प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जमील शेख हत्येचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले आहे की, ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरण २३ नोव्हेंबर २०२० रोजी घडले होते. ठाण्याच्या राबोडी भागात,सकाळी एका मदरश्याजवळ बाईकवर बसलेल्या दोन तरूणांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार करून ठार केलं होतं. या प्रकरणात अजून देखील पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाहीये. जमील शेख यांच्या पत्नीने आज सर्व विरोधी पक्ष्यनेत्यांची भेट घेत या प्रकरणात लक्ष घालावे,अशी मागणी केली. त्यांनी देखील यात सकारात्मक भूमिका घेऊ,असा शब्द जमील शेख यांच्या पत्नीला दिला.

Raj Thackeray Morcha : मोर्चाला अद्याप परवानगी नाही

हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. हा मोर्चा ५ जुलैला गोरेगाव चौपाटीपासून निघणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मराठी बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Morcha : शुटींग बंद ठेवा...

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी येत्या ५ जुलैला मराठी मालिका व चित्रपटांचे शुटींग बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण, कृतज्ञता म्हणून सर्वांनी ५ जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया ५ जुलैला मराठी मालिका, चित्रपट यांचे शुटींग बंद ठेवावे, अशी विनंती खोपकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT