AdityaThackeray सरकारने कितीही बळ लावलं तर पाच तारखेला मोर्चा निघणारच : आदित्य ठाकरे
हिंदी सक्तीच्या विरोधात काढण्यात येणारा मोर्चा राज्य सरकार कितीही बळ लावून होऊ देणार नाही, असे म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील तर सरकारने कितीही बळ लावलं तर ते तोडून आम्ही पुढे जाऊ. मोर्चा काढण्याची गरज नसेल असे त्यांना वाटत असेल तर तुमच्या हाती सत्ताधारी पक्ष आहे. भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत, त्यांच्या डोक्यात ती किड वळवळू शकते. त्याला आम्ही विरोध म्हणून रस्त्यावर नक्की उतरू, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बबनराव लोणीकरांसारखे कॅबिनेट मंत्री राहिलेले लोक शेतकऱ्यांविषयी अत्यंत अपमानास्पद पद्धतीने बोलतात. तसेच, सरकारमधील मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे. अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. मुख्यमंत्री भ्रष्टाचारमुक्तीच्या घोषणा करतात आणि मंत्री हजारो कोटींच्या भ्रष्टाचारात अडकतात. शेतकरी राज्यातील जनतेशी बेईमान आहे, त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे बारावे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. रवींद्र चव्हाण हे येत्या मंगळवारी एक जुलै रोजी नूतन प्रदेशाध्यक्षांची सूत्रे हाती घेणार आहेत. सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री झाले आहेत, तत्पूर्वीच चव्हाण यांना कार्यकारी प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. चव्हाण हे आता बावनकुळे यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केली, हा त्यांचाच निर्णय आहे. ही सक्ती दूर करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम केले आहे, मनसेने पहिल्यांदा २००९ मध्ये मराठीचा मुद्दा उचलला. यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे. गोरेगावच्या पत्राचाळीतून ज्यांनी मराठी माणसाला हाकलून दिलं. आता त्यांचा जनाधार कमी झाला, त्यामुळे त्यांना आता मराठी माणूस आठवला. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी केला आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयाची आम्ही होळी केली आहे, असे भाजप आमदार राम कदम यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे काका पुतणे पुन्हा एकदा बारामतीत एकत्र आले आहेत. ‘एआय’ संदर्भातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे, त्यासाठी हे काका पुतणे एकत्र आले आहेत. या वेळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, राजेंद्र पवार उपस्थित होते.
Idris Nayakwadi : संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा : इद्रिस नायकवडी
राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आमदार संग्राम जगताप यांना पटत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास आमचा पक्ष आणि आमचे नेते त्यांच्यावर कारवाई करायला समर्थ आहेत. संग्राम जगताप यांनी स्वतःहून राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे. ते स्वतःहून दूर न झाल्यास त्यांना कसं दूर करायचं, हे आमचने नेते जाणून आहेत. तुम्ही राष्ट्रवादीच्या विचारांशी फारकत घेतली असेल तर तुम्ही ती नवीन वाटही चोखाळा. त्यात आमचं काय म्हणणं नाही, असा टोला आमदार इद्रिस नाईकवडी यांनी आमदार संग्राम जगतपा यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.