Maharashtra Local Body Election 2025 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra local body elections: जिल्हा परिषदेची निवडणूक नव्या वर्षातच, दोन टप्प्यात होणार फैसला; संभाव्य वेळापत्रकाने वाढली धाकधूक!

Zilha Parishad election Date Update : तिसऱ्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद आता नव्या वर्षात म्हणजे 31 जानेवारीपर्यंत होणार आहेत. आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Elecction Date schedule 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर सध्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 29 महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद आता नव्या वर्षात म्हणजे 31 जानेवारीपर्यंत होणार आहेत. आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार होण्याची शक्यता आहे.

आयोगातील आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 12 जिल्हा परिषद आणि 336 पैकी 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 21 दिवसात म्हणजे 31 जानेवारीच्या आत होणार आहेत. त्यासाठी 8 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता लागू शकते, असे आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रकच पुढे आल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

एकीकडे राज्यातील नगरापलिका, नगरपंचायत निवडणुका पार पडल्या तर आता महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर आता प्रलंबित 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आरक्षणाच्या तिढ्यामुळे दोन टप्प्यात होण्याची शक्यता आयोगातील आधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 336 पैकी 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 21 दिवसात होणार आहेत. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची वेळ सर्वोच्च न्यायालयने दिलेली आहे. पण या कालावधीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. 20 जिल्हा परिषदेत आणि 211 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या निवडणुकांना आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित 12 जिल्हा परिषदा आणि125 पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

या 12 ठिकाणच्या झेडपीच्या निवडणूका पहिल्या टप्प्यात

राज्यातील 32 पैकी 12 जिल्हा परिषदेत 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादेचे पालन केले आहे. त्या झेडपीची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 21 दिवसांत निवडणूक कार्यक्रम पूर्ण केले जाणार आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील,असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

6 ते 8 जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 31 जानेवारीनंतरच होतील, असे समजते.

या 12 जिल्हा परिषदेचा संभाव्य कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

या ठिकाणच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा 6 ते 8 जानेवारी दरम्यान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 10 ते 17 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. अर्जांची छाननी अन्‌ माघार घेण्यासाठी 18 ते 20 जानेवारीपर्यंत कालावधी असणार आहे. चिन्ह वाटप 21 जानेवारीला करण्यात येईल. तर मतदान 30 जानेवारीला पार पडणार आहे तर मतमोजणी 31 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT