परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांचा एक लाख 33 हजाराच्या फरकाने पराभव केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहरांमध्ये ठीक-ठिकाणी फटाक्यांची आतेश बाजी करीत गुलाल उधळला जात आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी विजयाच्या मिरवणुका काढण्यात येत आहेत. या रॅलीत मोठा मोठा उत्साह बघायला मिळतोय...
शशिकांत शिंदे ( शरद पवार गट ) - 2 लाख 83 हजार 542
उदयनराजे भोसले ( भाजप ) - 2 लाख 9 हजार 976
आघाडीवर - शशिकांत शिंदे 13 हजार 542 मतांनी आघाडीवर
नरेश म्हस्के ( शिंदे गट ) - 1 लाख 94 हजार 449
राजन विचारे ( ठाकरे गट ) 1 लाख 32 हजार 203
आघाडीवर : नरेश म्हस्के 62 हजार 244
जळगाव लोकसभा तिसरी फेरीनंतर भाजपच्या स्मिता वाघ 70 हजार 372 मतांनी आघाडीवर आहेत. वाघ यांना 1लाख 48 हजार 891 मते तर ठाकरे गटाचे करण पवार यांना 78 हजार 579 मते मिळाली आहेत.
चौथ्या फेरी अखेर शशिकांत शिंदे आघाडीवर 20 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
भिवंडीत पाचव्या फेरीनंतर कपिल पाटील पिछाडीवर आहेत. कपिल पाटील यांना 34 हजार 945 मते पडली आहे. तर, सुरेश म्हात्रे 41 हजार 495 मते मिळाली आहे. म्हात्रे 6 हजार 550 मतांनी आघाडीवर आहेत.
दुसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 5655 मतांनी आघाडीवर आहेत. उदयनराजे पिछाडीवर आहेत.
अमरावतीतून बळवंत वानखेडे 5 हजार 246 मतांनी आघाडीवर आहेत. नवनीत राणांना 1 हजार 707 मते मिळाली आहेत. वानखेडे 3 हजार 539 मतांनी आघाडीवर
सांगली लोकसभा चौथी फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 20 हजार 327 मतांनी आघाडीवर आहेत.
नाशिकमधून चौथ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे 1 लाख 15 हजार 709 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत गोडसे यांना 79, 369 मते मिळाली आहे. वाजे लीड 36 हजार 340 मतांनी आघाडीवर आहेत.
परभणीतून ठाकरे गटाचे संजय जाधव 20 हजार 786 मतांनी आघाडीवर आहेत. तर महादेव जानकर यांना 17 हजार 722 मते पडली आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे 48,700 मतांनी आघाडीवर आहेत. भारती पवार यांना 42,500 मते पडली आहेत. भगरे 6200 मतांनी आघाडीवर आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे स्मिता वाघ आघाडीवर आहेत. त्यांना 29 हजार 70 तर शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांना 14 हजार 777 मते मिळाली आहेत. यात भजपच्या स्मिता वाघ पहिल्या फेरीत 15 हजार 525 मतांनी आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरी 55185 मतमोजण्यात आली. पहिल्या फेरी अखेर इम्तियाज जलील 19745, संदिपान भुमरे 16407 आणि चंद्रकांत खैरे 11434 मते पडली आहेत. इम्तियाज जलील 3 338 मतांनी आघाडीवर आहेत.
दुसऱ्या फेरीनंतर धैर्यशील माने 23372 मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांना 22401 मते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2700 इतकी मते घेऊन तिसऱ्या स्थानावर आहेत.
शिंदे गट - प्रतापराव जाधव - 13347 मते
ठाकरे गट - नरेंद्र खेडेकर (महाविकास आघाडी) - 10089 मते
अपक्ष -रविकांत तुपकर - 7467 मते
वंचित - वसंत मगर - 2834 मते
शिंदे गट - सदाशिव लोखंडे - 3 हजार 937 मते
ठाकरे गट - भाऊसाहेब वाकचौरे - 3 हजार 584 मते
वंचित - उत्कर्षा रुपवते - 650 मते
पोस्टल मतदानानंतर भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना 18 हजार 444 तर, नीलेश लंके यांना 18 हजार 254 मते मिळाली. यात सुजय विखे यांना 190 मतांचा लीड आहे.
पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे 5151 मतांनी आघाडीवर
भाजप - कपिल पाटील - 22810 मते
राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) - सुरेश म्हात्रे - 16361 मते
अपक्ष - निलेश सांबरे - 12013 मते
सुप्रिया सुळे अकरा हजार 532 मतांनी आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या फेरीत संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. बीडमध्ये बजरंग सोनवणे 1359 मतांनी, शाहू छत्रपती 8000 मतांनी, ओमराजे निंबाळकर 12746 मतांनी, हातकणंगले मतदारसंघात काही गावांतमध्ये धनुष्यबाण काही गावांमध्ये मशाल आघाडीवर आहे. शिरूरमध्ये 9553 मतांनी अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
बीड विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे 2077 मतांनी आघाडीवर तर पंकजा मुंडे पिछाडीवर..
पोस्टल मतदान मोजणीनंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला नगरमध्ये अजून सुरूवात नाही.
परभणीत संजय जाधव, संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर
सांगली लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रात विशाल पाटील आघाडीवर आहेत.
कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज 1036 मतांनी पुढे आहेत.
शिर्डीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे मतदानाच्या पहिल्या कलमध्ये आघाडीवर आहेत. तिथे त्यांचा सामना शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबरोबर आहे.
पोस्टल मतदान मोजणीत भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे आघाडीवर असल्याचा पहिला कल आला आहे.
हिंगोलीत मतमोजणी मशिनमध्ये बिघाड झाला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी EVM मशिन ताब्यात घेतलं आहे.
जळगावमध्ये स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत झाली होती. यातच ठाकरेंचे करण पवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
धुळे - हिना गावित
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
वायव्य मुंबई - अमोल कीर्तिकर
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
सांगली - संजयकाका पाटील
उत्र मध्य मुंबई - वर्षा गायकवड
ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील -
कोल्हापूर - शाहू महाराज
हातकणंगले- सत्यजित पाटील
नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर
पालघर - भारती कामडी
अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा पिछाडीवर पडल्या असून, तिथे तिने बूब आघाडीवर असल्याचा कल समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर
पोस्ट मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत.
कल्याणध्ये खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर यांच्यात लढत झाली होती. पोस्टल मतांमध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत.
जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत.
बारामतीत पोस्टल मतांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पोस्टर मतदानाची मोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. नगर दक्षिणसाठी 2 हजार 829 तर, शिर्डीसाठी 1 हजार 115 टपाली मते प्राप्त झाली. याशिवाय 85 वय असलेले आणि दिव्यांगांची नगरमध्ये 3 हजार 670 आणि शिर्डीत 1 हजार 847 मतदान झाली आहेत. अशी एकूण 9 हजार 461 मतांची मोजणी सुरू झाली आहे.
सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. मतमोजणी केंद्रावर विशाल पाटील यांच्या गाडीची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली.
माढा मतदारसंघातील टपाली मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 6900 टपाली मतदानाची मतमोजणी होणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) भास्कर भगरे यांनी लोकसभा निकालापूर्वी आईचे दर्शन घेतलं. त्यासह गावातील ग्रामदैवतेचे दर्शन घेतलं. यावेळी कुटुंबीयांनी भास्कर भगरे यांचं औक्षण केलं. शेतीसह अनेक प्रश्न भाजप खासदारांच्या काळात सुटले नाहीत. जनतेनं मला मतदान केलं. त्यामुळे मी नक्की निवडून येणार, असा विश्वास भास्कर भगरे यांनी व्यक्त केला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील बेरोजगारी, आणि विकासाचे प्रश्न जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये महायुतीच्या उमेदवारा विरुद्ध संताप आहे. त्यामुळे आपल्याच बाजुने निकाल लागेल. आपण 1 लाख 72 हजार मतांनी निवडून येऊ असा विश्वास मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला. कोणत्याही सर्वे वर आपला विश्वास नाही तर जनतेने दिलेल्या कोल आपल्याला विजयी करेल असं ही वाघेरे म्हणाले.
कल्याणमध्ये मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच परिसरातील बत्तीगुल झाल्यानं अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 22 ते 25 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर महायुतीला 20 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.