sarkarnama Live Updates sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : रायगडच्‍या कोर्लई किनाऱ्याला लागली संशयीत बोट? सुरक्षा यंत्रणांकडून मोठा खुलासा

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Aslam Shanedivan

Raigad News : रायगडच्‍या कोर्लई किनाऱ्याला लागली संशयीत बोट? सुरक्षा यंत्रणांकडून मोठा खुलासा

Raigad News : रायगडच्‍या कोर्लई किनाऱ्याला लागली संशयीत बोट? सुरक्षा यंत्रणांकडून मोठा खुलासा

मुरूडच्‍या कोर्लई समुद्रकिनारी आढळून आलेल्‍या संशयित बोटीचा उलगडा झाला असून ती बोट नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ती संशयास्‍पद वस्‍तू म्‍हणजे मासेमारीसाठी वापरण्‍यात येणारा बोया असल्‍याचं समोर आलं आहे. त्‍यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. तटरक्षक दलाच्‍या शोधमोहीमेत ही बाब स्‍पष्‍ट झाली असून रायगड पोलीसांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

Rohit Pawar Demands Funds : अजित पवार यांनी ‘अपनो को किया पराया’, निधीवरून रोहित पवारांचा टोला

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस असून आज मतदारसंघातील निधीवरून भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. याची चर्चा सुरू असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी देखील निधीवरून सभागृहात टोलेबाजी केली. त्यांनी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. पण आता अजित पवार यांनी ‘अपनो को किया पराया’ अशी स्थिती असल्याचं म्हणत टीका केली आहे.

Rohini Khadse News : 'अरे, जरा तरी लाज वाटू द्या रे गिधाडांनो!'; प्रिया फुकेवरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरोधात भावजय प्रिया फुके या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आज विधानभवनाबाहेर येत परिणय फुकेंविरोधात गंभीर आरोप केले होते. तसेच विधानभवनाबाहेर निदर्शन करत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केलीय. त्यांनी ही टीका समाजमाध्यमावर केली असून अरे, जरा तरी लाज वाटू द्या रे गिधाडांनो! एक निराधार महिला आपल्याला न्याय मिळावा या अपेक्षेने आपल्या चिमुकल्या मुलांसह सरकारच्या दारात येते तर तिला अशाप्रकारे डांबण्यात येते ? कुठे हे फेडाल ही पापं? असे म्हटलं आहे.

RSS on Hindi Language Row : राज्यातील भाषा वादावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया; 'राज्यात स्थानिक भाषेत...'

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केले. यानंतर आता आरएसएसची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी, देशातील सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे राज्यात शिक्षण देखील स्थानिक भाषेतच घ्यावं हेच संघाचं मत असल्याचेही आंबेकर यांनी मांडले आहे.

Sangli Politics : जयश्री पाटलांच्या धक्क्यानंतर काँग्रेस नेत्यांना जाग आलीच

दरम्यान काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी जोरदार धक्का दिला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या धक्क्यानंतर आता काँग्रेस नेत्यांना जाग आली असून आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर किशोर जामदार, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, विशाल कलगुटगी, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Politics News : 'यांच्या खासदार चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही आणि....'; शिवसेनेची टीका

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले. हे दोघे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यात युती होण्याचे संकते मिळत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत आहेत. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर निशाणा साधताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आहे. तर यांच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना दोन ओळीही मराठी बोलता येत नाहीत. त्यांना बाळासाहेबांचे नाव देखील स्पष्ट घेता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मराठीवर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे.

Maharashtra Politics News : उपसभापती नीलम गोऱ्हेंनी भाजप मंत्र्याला फटकारलं; म्हणाल्या, 'शेवटच्या क्षणाला...'

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप नेते मंत्री अतुल सावे यांना फटकारतं खडे बोल सुनावले. याची आता चर्चा सुरू झाली असून शेवटच्या क्षणाला अहवाल कसा काय मागवता. सभागृहात यायच्या आधीच याची माहिती घ्यायची असते, असे सुनावले. गोऱ्हे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावली होती. पण मंत्री अतुल सावे यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने त्या भडकल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT