विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात पुन्हा प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या मेळाव्यात तसे ठणकावून सांगितले होते. असे असतानाही राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आणि तत्कालीन प्रदेश सचिव आभा पांडे यांना आज पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारतीय जनता पर्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. ज्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता ज्यांने शुन्यापासून सुरुवात केली तो आज या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो. हे केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, असे गौरव उद्गार महाराष्ट्र भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काढले.
आयपीएल स्पर्धेत 17 वर्षानंतर आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच 4 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता केंद्रीय प्रशासकीय न्यायप्राधिकरणाने (CAT) प्रथमदर्शनी आरसीबीला जबाबदार धरलं आहे.
कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना अनेकदा धमक्या मिळाल्याचे समोर आले आहे. आता सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते, असा खळबळजनक दावा केला आहे. तसेच या प्रकरणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या जबाबदार धरावे असेही म्हटलं आहे.
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी विद्यार्थीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता याचे पडसाद पासाळी अधिवेशनात देखील उमटले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात आमदार धनंजय मुंडे यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केला होता. तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी करत क्षीरसागर आणि आरोपी रात्री 11 वाजेपर्यंत सोबत होते असा दावा करत चौकशी करण्याची मागणी केली होती.
दक्षिण कोलकात्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत असून तिघा नराधमांनी तो बलात्कार केला. लॉ कॉलेजच्या त्या 24 वर्षीय पीडित विद्यार्थिनीला अत्याचारादरम्यान पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले असून इनहेलर देऊन पुन्हा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Air India Plane : धक्कादायक! एअर इंडियाचं आणखी एक विमान अपघातग्रस्त होता होता वाचलं
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला 12 जून रोजी झालेला अपघात अजून ताजा असतानाच आणखी एका विमानांमधील गडबडीचे प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाचं दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारं विमान तांत्रिक बिघाडामुळे 900 फुटांपर्यंत खाली आलं होतं. सुदैवाने हे विमान कोसळलं नाही. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. तर ही घटना 14 जून असून पहाटे 2 वाजून 56 मिनिटांनी या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.