Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : विधान परिषदेसाठीचा महायुतीतील तिढा अखेर सुटला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधानपरिषदेसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर, यासह राज्यभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

अखेर राष्ट्रवादीचं ठरलं! पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर

पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आी आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयात काल रात्री 8.30 वाजता उमेदवार निश्चित करण्या संदर्भात ही बैठक बोलावली होती. या बैठकीत काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. कल्याणपूर यांना केंद्र सरकारने 2023 साली त्यांना 'पद्मभूषण' या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

विधान परिषदेसाठीचा महायुतीतील तिढा अखेर सुटला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून त्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT