Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च - संजय राऊत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधानपरिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध, 12 ठिकाणी महायुती आणि मविआ आमने सामने, यासह आज दिनांक 05 जून रोजीच्या दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च - संजय राऊत

संजय राऊत याी ट्विट करत म्हटले आहे की, विधान परिषद निवडणूक: काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे, कोकण छ.संभाजी नगर पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत

रेपो दर जैसे थे, आरबीआयचा निर्णय

वाढती महागाई, जागतिक आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवला आहे. सलग तीन वेळा दर कायम ठेवले आहेत. क्रूड ऑईलचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवत मोठा दिलासा दिला आहे.

विनायक राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून सुपारी घेतली - बाळ माने

कोकण विधान परिषदेतून माघार घेतलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबीत केलेले बाळ माने यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोप केले. राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून सुपारी घेतली आहे. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेणार

देशात २१ जून रोजी नीट परीक्षा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.

बाळ माने भाजपच्या वाटेवर, सुत्रांची माहिती

कोकण विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने हकालपट्टी केलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे यंदाचा 40 वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे. 26 जून रोजी शाहू स्मारक भवनात होणार या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कोकणातून बिनविरोध निवड होताच तटकरे पिता-पुत्र सुनेत्रा पवारांच्या भेटीला

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती सुनेत्रा पवारांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

Maharashtra Politics Live Update : हरियाणात उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली, अनेक कामगार अडकल्याची भीती

हरियाणातील फरिदाबादला जोडणाऱ्या जेवर एक्सप्रेसवेवरील उड्डाणपुलाच्या बांधकामा दरम्यान क्रेन कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT