Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकून न घेताच निष्कर्ष काढला - सिब्बलांचा दावा

Marathi Breaking Live Headlines Updates : राज ठाकरेंचा पुणे दौरा, सुप्रीम कोर्टात शिवसेनेवर सुनावणी, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Shiv Sena news : अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित असताना पक्ष-चिन्हाचा निर्णय

अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्ष-चिन्हाचा निर्णय घेतला. हे चुकीचे होता, असा आक्षेप कपिल सिब्बल यांनी यावेळी घेतला. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निकालाचा फेरविचार व्हावा, अशी मोठी मागणीही सिब्बल यांनी यावेळी केली.

Supreme Court update : आमची बाजू ऐकून न घेताच निष्कर्ष

निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकून न घेताच निष्कर्ष काढला. लवादाला कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला. घटनापीठाने फुटीनंतरच्या घडामोडींचा विचार करू नका, असे म्हटले होते. त्यानंतरही आयोगाने फुटीनंतरच्या घडामोडींचा विचार कसा केला, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथील एका गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला करण्यात आला. एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने बादल यांच्यावर वार केले. हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

Kapil Sibal news : कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद

कपिल सिब्बल यांनी आज निवडणूक आयोगाच्या निर्णयातील जनता दलाबाबतच्या निर्णयावर युक्तिवाद केला. जनता दलाचा निर्णय देताना संघटनात्मक बहुमताचा आधार घेण्यात आला होता. आमच्याबाबतीत तो निकष फेटाळण्यात आला, असे सिब्बल यांनी सांगितले.

शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणीला सुरूवात

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणीला सुरूवात झाली आहे. आजही ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणार आहेत.

Pune Congress Protest पुण्यात काँग्रेसचं 'खड्डे में बर्थ डे' आंदोलन

पुण्यात काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात अनोखं 'खड्डे में बर्थ डे' आंदोलन करण्यात येतयं. स्वारगेट परिसरात रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून कॉंग्रेसनं अनोखा निषेध नोंदवलाय. खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून केक कापण्यात आलाय.

Varsha Gaikwad : कुंभमेळा झाला सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा?  वर्षा गायकवाड यांची चौकशीची मागणी

कुंभमेळ्याच्या घोटाळ्यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय.. तसंच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारी एक पोस्टही त्यांनी आपल्या एक्स हँडलवर केली आहे...

जनतेच्या श्रद्धेचा वापर करून सरकारी तिजोरी लुटण्याचा हा कोणता विकास? कागदावर कोट्यवधींची कामे, ठेकेदारांकडून वसुली, बनावट कागदपत्रे आणि सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवून वर्क ऑर्डर्स हा फक्त भ्रष्टाचार नाही,हा भाविकांच्या श्रद्धेवर आणि जनतेच्या पैशांवर टाकलेला दरोडा आहे.

मंत्री महोदय यांनी तर नातेवाईकापासून हात झटकले, कारवाई करा सांगतात.पण या वर्क ऑर्डर्स निघेपर्यंत सरकार ,प्रशासन काय करत होते? कुंपण शेत खात असेल तर कारवाई कशी होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष यंत्रणेमार्फत झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

मदरसा असो वा वैदिक पाठशाळा; टीईटी सगळ्यांसाठीच बंधनकारक होणार? राज्यातील बड्या नेत्याची थेट सुप्रीम कोर्टात याचिका

मदरसे, वैदिक पाठशाळा आणि प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (TET) बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी करत राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

Nishikant dubey : राहुल गांधी म्हणजे मोहम्मद अली जिनांचा दुसरा जन्म, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य 

भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी म्हणजे मोहम्मद अली जिनांचा दुसरा जन्म आहे. ते जिनांपेक्षाही अत्यंत धोकादायक नेते आहेत,” असा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसेच, काँग्रेसला जर खरोखरच विद्यार्थ्यांचे हित प्रिय असेल, तर त्यांनी तात्काळ हेमंत सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

उद्योगमंत्री उदय सामंत नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळला. उड्डाणापूर्वी पायलटच्या लक्षात हा प्रकार आल्याने संभाव्य मोठा धोका टळला. मात्र, हेलिकॉप्टरची आधीच तांत्रिक तपासणी झाली होती का, असा सवाल उपस्थित करत स्थानिक शिवसैनिकांनी चौकशीची मागणी केली आहे.

मोदी- शाह संसदेत आले, पण लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सभागृहात उपस्थित होते. मात्र, कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष होते. लोकसभा तहकूब होताच विरोधकांनी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली.

वीज ग्राहकांना झटका! ऑगस्टमध्ये वाढीव वीज बिलाचा भार

महावितरणने जुलैच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केले आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना वापरानुसार प्रति युनिट १० ते ६० पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. याचा परिणाम ऑगस्टच्या बिलावर दिसणार आहे. उन्हाळ्यातील वाढलेली वीज मागणी आणि महागड्या वीज खरेदीचा खर्च भरून काढण्यासाठी हे शुल्क आकारण्यात आले आहे.

NEET आंदोलक विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; आंदोलनाचे खटले मागे घेण्याची मुदत वाढवली

NEET पेपरफुटीविरोधात राज्यभर आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थी आणि तरुणांना महाराष्ट्र सरकारने दिलासा दिला आहे. आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांचे खटले मागे घेण्याची मुदत मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याने आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Shivsena News: शिवसेना पक्ष, चिन्ह आज पुन्हा सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येणार आहे. पक्ष-चिन्हावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

Beed News: बीडमध्ये किरकोळ वादातून गोळीबार

किरकोळ कारणाहून बीडमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहय यातील आरोपी वाल्मिक कराडाचा समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी सफवान खाननं वाल्मिक कराडाचा फोटो हातात घेतल्याचा व्हिडिओ समोर आसा आहे.

Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी ते करणार आहेत. १७ ऑगस्टला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.

PMC NEWS: पुण्यातील महापौर निवासाचे नाव बदलू नका, माजी महापौर संघटनेची मागणी

भाजपच्या एका नगरसेवकांनी महापौर बंगल्याचे नाव रामदूत करण्याचा प्रस्ताव दिला आहे, 2008 ला ही वास्तू उभारली तेव्हापासून त्याच नाव महापौर बंगलाच असल्याचं निवेदनात म्हटले आहे, पुण्यातील महापौर निवासाचे नाव बदलू नका अशी मागणी माजी महापौर संघटनेने केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील पक्ष कार्यालयात शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. सकाळी ११ वाजता बैठक सुरु होईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT