उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रगती पाहवत नाही. जगातील ३४-३५ देशांनी मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. विरोधी पक्षातील नेते नेहमीच मोदींवर आरोप करत आहेत. मोदींनी जगभरातील देशांसोबत भारताचे चांगले संबंध निर्माण केले, असे शिंदे म्हणाले आहेत.
दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. तसा ई-मेल कोर्टाला पाठविण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टाच्या परिसरात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून ४० प्रश्नांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये जात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या दर्जाचाही समावेश आहे. सरकारी आदेशानुसार, जनगणनेतील लोकसंख्या मोजणीचा टप्पा १ सप्टेंबरपासून हिमाच्छादित भागांमध्ये सुरू होणार आहे.
शिक्षणसंस्था, सामाजिक संस्थांसाठी परदेशातून निधी येतो. पोलिआ हा सामाजिक संस्थांच्या मदतीने भारतातून हद्दपार केला. असे काही उपक्रम सगळे मिळून करू शकतो. पण या सामाजिक संस्था या काहीतरी देशद्रोहाचे काम करत आहेत, असा एफसीआरएची भूमिका आहे. ते आम्हाला मान्य नाही, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी FCRA कायद्याला विरोध केला.
कर्नाटक सरकारने सरकारी परिसर आणि सार्वजनिक संपत्तीच्या वापरासाठी नवा कायदा कर्नाटक सरकारने सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक जागांच्या वापरासाठी स्वतंत्र कायदेशीर चौकट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता.13) 'द कर्नाटक रेग्युलेशन ऑफ यूज ऑफ गव्हर्नमेंट प्रिमायसिस अँड पब्लिक प्रॉपर्टी बिल, 2026' या विधेयकावर चर्चा केली. प्रस्तावित कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तीवर कार्यक्रम, सभा किंवा इतर उपक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. या कायद्याचा RSS सह सर्वच खासगी व्यक्ती, संस्था, संघटना आणि इतर गटांना लागू होण्याचा सरकारचा दावा आहे.
बीड जिल्ह्यात विविध बँकांमधील मनी म्युल खात्यांचा वापर करून तब्बल २४ कोटी रुपयांच्या ऑनलाइन सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तपासातून सायबर गुन्हेगारांचे मोठे सिंडिकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या एस टी स्टँडची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. एसटी स्टँड भागातील स्वच्छता, सुरक्षा आणि कामकाजाबाबत सरनाईक यांच्याकडून आढावा घेतला.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकला भेट दिली. पुण्याहून नाशिकला येताना त्यांनी चाकण आणि नाशिकच्या खड्ड्यांचा अनुभव सांगितला. महापालिकेच्या कारभारावर बोलतानाच त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची दुखरी नस पकडली. राज्यभरातील रस्ते नादुरुस्त आहेत. अगदी समृद्धी महामार्गावर देखील पॅच लावले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न करून फेकनाथ शिंदे कोणाच्या आशीर्वादाने मंत्री आहेत? नगर विकास मंत्री कोण आहेत? असा सूचक प्रश्न त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणून त्यांचे मोबिलायझेशन केले जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर केला आहे. दानवे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे 'जगातील सर्वात मोठा पक्ष'! छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता दहावीचे मुलं कार्यक्रमासाठी दुपारी १२ पासून क्रांती चौकात आणून बसवले जाणार आहेत. ही फक्त एकाच शाळेची यादी, अगदी मोबाईल नंबर सहित. मुलांच्या करिअरचं, परीक्षेचं काय व्हायचं ते होवो.. साहेबांसमोर गर्दीचा फुगा कसा फुगवायचा एवढाच काय तो येथील भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'!", अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहराची वाट लागली आहे. त्यावर साधू महंतांनी ही या कामांची गरज आहे का? असा प्रश्न केला. याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. हा सर्व जनतेचा पैसा आहे. नासाडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी जामनेरमधील दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, आणखी पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक
पुण्यातील मनसे शहराध्यक्ष अनेक पदाधिकारी यांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्याची बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
राज ठाकरे घेणार शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
गेल्या अनेक दिवसात मनसेमध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा होती,मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून आज महत्त्वाची बैठक होणार आहे
राहुल गांधींनी गुरुवारी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टोलेबाजी केली. मोदींचं परराष्ट्र धोरण कसं आहे, हे दाखवताना राहुल यांनी मंचावरच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची गळाभेट घेतली. गळाभेट घेणे हे यांचे परराष्ट्र धोरण आहे, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि दीक्षित यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होत आहे.
येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनाही अंधाधुंद मारहाणीत दुखापत झाली. घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.
चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारी सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये गायकवाड यांना दुखापत झाली. घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, इनाम व गायरान जमिनी, भूमिहीन कुटुंबांच्या घराच्या जागा तसेच खतांचा तुटवडा व लिंकिंग आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही करून विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.