बदलापुरातील मच्छी विक्रेत्यांवरील कारवाईचा वाद चांगलाच पेटलाय. उघड्यावर बेकायदेशीरपणे मच्छी विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी घेतलीय. तर शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे मच्छी विक्रेत्यांच्या समर्थनात उतरले आहेत. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांवरून आता थेट सेना-भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “आमच्या मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य करा” असा अल्टिमेटम देत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विषयी साम टिव्हीने वृत्त दिले आहे. १२ मे रोजी सुनील तटकरे यांच्यासोबत प्रफुल पटेल यांनी देखील पवारांची भेट घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव, इंदापुरमध्ये मुंबई लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शनिवार आणि रविवार उन्हाळी सुट्टीकरिता पर्यटक कोकणाच्या दिशेने निघाल्याने ही कोंडी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.