Ravindra Dhangekar sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: खलील शेख आत्महत्या प्रकरण: रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह १० जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

खलील शेख आत्महत्या प्रकरण: रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह १० जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune News: पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिक व आणि कंत्राटदार असलेल्या खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात धंगेकरांवरही आरोप केले होते. आता याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात धंगेकर त्यांच्या पत्नी यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वांगचूक यांच्या उपोषणाचा गुरुवारी (ता.16) एकोणिसावा दिवस आहे. याबाबतची माहिती आंबेडकरांनी ट्विटद्वारे दिली आहे.

मोठी बातमी: जयंत पाटील एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 'नंदनवन' निवासस्थानी दाखल,आव्हाडही सोबत

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दोन दिवसांतच आता ठाण्यात दाखल झाले आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. पाटील हे भेटीसाठी शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहेत. त्यांच्यासमवेत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांना सभागृहातच आली भोवळ

मुंबई महापालिकेत गुरुवारी(ता.16 जुलै) सत्ताधारी आणि विरोधकांमधील घोषणाबाजी व शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष पेटला असतानाच मुंबई महापालिकेच्या माजी महापौर तथा विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अचानक चक्कर आली. यानंतर काहीवेळ महापालिकेच्या सभागृहातलं वातावरण काहीवेळ भावनिक झालं होतं.यावेळी राजकीय वादविवाद बाजूला ठेवत महापौरांसह सत्ताधारी आणि विरोधक पेडणेकरांच्या मदतीला धावल्याचं दिसून आलं.

Jagnath Rathyatra : १२० हून अधिक भाविक रुग्णालयात दाखल

ओडिशाच्या पुरीमध्ये आयोजित जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेत गुरुवारी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती ओढवल्यानं मोठी दुर्घटना घडली. भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळं बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यात गुदमरून एका भाविकाचा मृत्यू झाला. तर १२० हून अधिक भाविकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुरीच्या जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयासह इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ambadas Danve : रामरक्षा आंदोलनावर टीका करणाऱ्या भाजप प्रवक्त्यांवर संतापले

नवनीत राणा, नवनाथ बन हा चिल्लर विषय आहे. या विषयावर मी बोलत नाही असे म्हणत हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची यांनी टीका केली. 18 जुलै रोजी नागपूर मध्ये उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन होणार आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा या अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत, यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. नवनीत राणा हा चिल्लर विषय आहे असे म्हटले आहे. बन फन हे चिल्लर लोक असे बोलत असतात, असे म्हणत दानवे यांनी नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा सादर होणार डिलिमिटेशन विधेयक; काँग्रेसची पार पडली बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक सादर केलं जाणार आहे. यासंदर्भात या विधेयकाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही यासंदर्भात काँग्रेसच्या बैठकीत महत्वाची चर्चा पार पडली. त्यामुळं हे विधेयक पुन्हा सादर झाल्यास या घटनादुरुस्ती विधेयकावर सरकारचा पुन्हा एकदा कस लागणार आहे.

एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे MPSCला सल्ला

पुणे, ता. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातून होत असलेला वाढता विरोध पाहता, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. एमपीएससीच्या परीक्षा लगेच ऑनलाइन न घेता, ऑगस्ट २०२७ पासून या प्रणालीची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला दिले आहेत. मात्र, विद्यार्थी संघटनांनी या भूमिकेवरही आक्षेप घेत ऑनलाइन परीक्षांना कोणत्याही परिस्थितीत विरोध कायम राहील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे MPSCला सल्ला

एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एमपीएससीला निर्देश

- एमपीएससीच्या अधिकृत निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १६ : पुणे, ता. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातून होत असलेला वाढता विरोध पाहता, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. एमपीएससीच्या परीक्षा लगेच ऑनलाइन न घेता, ऑगस्ट २०२७ पासून या प्रणालीची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला दिले आहेत. मात्र, विद्यार्थी संघटनांनी या भूमिकेवरही आक्षेप घेत ऑनलाइन परीक्षांना कोणत्याही परिस्थितीत विरोध कायम राहील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

मारहाण, धमक्या, पेपर स्प्रे...; मुंबई लोकलमध्ये अवघ्या १२ तासांत चार घटनांनी उडवली खळबळ

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस अधिक असुरक्षित होत असल्याचे चित्र आहे. धावत्या लोकलमध्ये प्राध्यापकांवर झालेला जीवघेणा हल्ला आणि मयंक लोहार हत्येची घटना अद्याप ताजी असतानाच, अवघ्या १२ तासांत उपनगरीय रेल्वेत चार धक्कादायक घटना घडल्या. कुर्ला स्थानकावर हातात काठी घेऊन धावणारी व्यक्ती, धावत्या लोकलमधील सीटच्या वादातून झालेली मारहाण, चर्चगेट-विरार लोकलमध्ये 'मशीन काढ' अशी धमकी दिल्याचा दावा असलेला व्हायरल व्हिडिओ आणि महिला प्रथम श्रेणी डब्यात पेपर स्प्रेचा वापर, या सलग घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवासी सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

नागपुरातील काँग्रेस नगरसेवकाच्या चारचाकी गाडीचा मध्य प्रदेशात भीषण अपघात

- नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या चारचाकी गाडीचा मध्य प्रदेशात भीषण अपघात

- शुभम मोटघरे आपल्या सहकाऱ्यांसोबत मध्य प्रदेशातून परत येत असताना हरदा रोड वरील जंगलात कार समोर अचानक एक नीलगाय आली

- समोर नीलगाय आल्याने ड्रायव्हरचे कार वरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन थेट पुलाखाली कोसळली

- अपघातात मोटघरे थोडक्यात बचावले,सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही.

- शुभम मोटघरे हे प्रभाग 26 चे नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक आहेत.

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार! सुरज साखरे हा कार्यकर्ता जखमी

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

गोळीबारात सुरज साखरे हा कार्यकर्ता जखमी

खाजगी सावकारी इथून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती

सुरज साखरे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

अर्धा किलो सोन्याच्या पादुका पांडुरंगाच्या चरणी अर्पण

अहिल्यानगर जिल्ह्यातील भक्ताने अर्धा किलो सोन्याच्या पादुका पांडुरंगाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. याची किंमत ५६ लाख ५९ हजार इतकी. श्री विठ्ठलाला आणि माता रुक्मिणीला ज्या दिवशी अलंकार करतो, त्याच दिवशी पांडुरंगाला या सोन्याचा पादुका घालण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

पुण्यात बिल्डरची आत्महत्या; बिल्डरची रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारी

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनविला होता. खलील शेख हे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत उत्कर्ष असोसिएटसमध्ये व्यावसायिक भागीदारीत होते. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर करण्यात आलेल्या बांधकामास स्थगिती मिळाल्याने ते आर्थिकदृष्ट्या गोत्यात होते.

आपच्या कार्यकर्त्यांनी काढली दुचाकीची अंत्ययात्रा : ई-20 पेट्रोलला विरोध

ई-२० पेट्रोलच्या विरोधात कोल्हापुरात आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. दुचाकीची अंत्ययात्रा काढत आपच्या कार्यकर्त्यांनी या धोरणाचा निषेध केला आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनाचे इंजिन धोक्यात येत आहे, त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचा केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी आपने केली आहे.

माजी खासदार विनायक राऊतांना अंतरिम संरक्षणास न्यायालयाचा नकार; अटकेची टांगती तलवार कायम

सुनेच्या तक्रारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांना अंतरिम संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. राऊत यांच्या अर्जावर २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत माजी खासदार राऊत यांच्या अटकेची टांगती तलवार आहे. सून गिरीजा यांच्या तक्रारीमुळे विनायक राऊत यांच्यासोबत गीतेश राऊत, श्यामल राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

पोलिसांचा धाकच नाही! संभाजीनगरात रिक्षाचालकाचा कहर

संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करताना मद्यधूंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र या कारवाईला न जुमानता सलग दुसऱ्या दिवशीही हा चालक पुन्हा नशेत रिक्षा चालवत असताना आढळलाय. या बेजबाबदार प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय. या मद्यधुंद रिक्षाचालकावर पोलिसांचा धाक आहे की नाही. पोलिसांनी त्याचं रिक्षाचं परमिट का निलंबीत केलं नाही असा संतप्त सवाल आता पालकांनी विचारलाय.

'सिनेमातील रॅंचोवर प्रेम वांगचुकांकडे दुर्लक्ष- अभिनेते सयाजी शिंदे यांची खंत 

अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर भाष्य करत नागरिकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सिनेमातील ‘रॅंचो’ या व्यक्तिरेखेला मिळणारे प्रेम आणि प्रत्यक्ष आयुष्यातील सोनम वांगचुक यांच्या कामाकडे होणारे दुर्लक्ष याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

20 जुलैच्या आंदोलनात सहाभागी व्हा सोनम वांगचुक यांचे आवाहन

सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लडाखच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशभरातील नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण संरक्षण, स्थानिक हक्क आणि घटनात्मक मागण्यांसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

स्विगी इन्स्टामार्टवरून आता घरपोच LPG सिलेंडर; बुकिंग झाली अधिक सोपी

घरगुती LPG सिलेंडर मागवण्यासाठी आता गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. स्विगी इन्स्टामार्टने सिलेंडर होम डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना काही क्लिकमध्ये सिलेंडर बुक करता येणार असून, जलद आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने घरपोच सेवा मिळणार आहे.

मोशी दुर्घटनेतील दोषींवर कारवाई कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

मोशीतील इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई झालेली नसल्याची टीका होत आहे. काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी सुरक्षा नियमांकडे झालेल्या दुर्लक्षासाठी नेमके दोषी कोण, याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आणि नाराजी आहे.

७/१२ उताऱ्यातील 'चलाखी' नडली!

सातबारा उताऱ्यामध्ये कायद्याचा गैरवापर करून 'चलाखी' करणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ चा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश देणाऱ्या १५ अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर, आता तब्बल ८४ अधिकारी शासनाच्या रडारवर आले आहेत. यामुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Wardha: वर्ध्यात 12 वर्षाच्या मुलीची अत्याचार करुन निर्घृण हत्या

वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचे माहिती समोर येत आहे. आधी मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खासदारांना स्मार्ट उपकरणांच्या वापराबाबत महत्त्वाच्या सूचना

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (20 जुलै) सुरू होत आहे. अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयाने सर्व खासदारांसाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. संसद परिसरात स्मार्ट घड्याळे, स्मार्ट चष्मे, पेन कॅमेरे आणि रेकॉर्डिंग करू शकणाऱ्या इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

Mumbai: मुंबईकर पावसाळी आजारांनी त्रस्त

मुंबईत पाऊस थांबला असला तरी आजारांचा धोका वाढला आहे. जानेवारी ते १४ जुलै या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. अनेक भागांत साचलेल्या दूषित पाण्यामुळे विशेषतः लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याने नागरिकांनी पाण्यातून चालणे टाळावे, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधक औषधे घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

PUNE News: पर्वती येथील  एसआरए प्रकल्पावर आज सुनावणी

पर्वती येथील शाहू वसाहत (सर्व्हे क्र. ९२) येथील पुनर्वसन प्रकल्पाबाबत प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भातील सर्व कार्यवाही सध्याच्या कायदेशीर तरतुदी आणि प्रक्रियेनुसारच सुरू होती. प्रकल्पाच्या कायदेशीर प्रक्रिये दरम्यान सध्या या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीबाबत सक्षम प्राधिकरणा समोर आज सुनावणी होणार असून, त्यानंतर पुढील अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.

Nagpur: राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने विजेची मागणी पुन्हा वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT