Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : मनोज जरांगेंच्या भेटीआधी प्रसाद लाड यांना धमकीचा फोन

Maharashtra Breaking News Today LIVE 22 May : भाजप नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार, यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

जरांगेंच्या भेटीआधी प्रसाद लाड यांना धमकीचा फोन

मनोज जरांगे यांची भेट घेण्याआधी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याच्या प्रयत्न केला. शिवाय याआधी लाड यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता. या धमकी प्रकरणी योगेश शितोळे पाटील, गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अभिजीतने राजकारणात जाऊ नये, 'कॉकरोच जनता पार्टी'ची चळवळ थांबवावी - भगवान दीपके

अभिजीत दीपके या तरुणाने स्थापन केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशभरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 7 दिवसांत या पार्टीचे इन्स्टाग्रामवर 18 मिलियनहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे तयार झालेल्या या चळवळीचे राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात असतानाच "अभिजीतने राजकारणात जाऊ नये, चळवळ आता थांबवावी", अशी प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी दिली आहे. अभिजीतचे वडील भगवान दीपके म्हणाले, "फॉलोअर्स वाढले तरी आम्हाला चिंता आहे. अभिजीतने राजकारणात जाऊ नये, आता चळवळ थांबवावी. प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही, आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते" अशी भीती भगवान दीपके यांनी व्यक्त केली.

CM फडणवीसांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वपूर्ण बैठक बोलावली असून या बैठकीत ते मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार आहेत.

इंधन दरवाढीचा फटका, नागपुरहून उडणारी अनेक विमानं एक जूनपासून बंद

 इंधन धरवाढीचा फटका बसल्यामुळे नागपुरहून उडणारी अनेक विमानं एक जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानाचा संचालन खर्च ५५ ते ६० टक्क्यांवर पोहोचल्याने नागपुरहून उडणारी अनेक विमानं बंद केली जाणार आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.

संजय शिरसाटांनी शिवसेनेच्या मेळाव्यातच केलं MIM, भाजपच्या कामाचं कौतुक

'एसआयआर' चा विषय सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी आणि तुमच्या आमच्या भवितव्यासाठी यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. हैदराबादहून ओवेसी या शहरात येतो काय? आपल्या कार्यकर्त्यांना अॅप देऊन एसआयआरची माहिती दिली जाते, त्यांची कार्यशाळा होऊन ते कामालाही लागतात? मग असे काम आपल्यालाल का जमत नाही? असा सवाल करत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एसआयआरच्या विषयावर एमआयएमने केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांची लोक मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत, त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, आपण मात्र काहीच करायला तयार नाही, अशी खंत शिरसाट यांनी व्यक्त केली. शिवाय भाजपाच्या संघटनात्मक कामाकडे पहा. त्यांचा कोणताही कार्यकर्ता भेटला की तो म्हणतो, आमच्या मागे पक्षाने खूप कामे लावली आहेत. या पक्षाच्या दीडशेहून अधिक वेगवेगळ्या विंग पक्षासाठी काम करतात. आपण मात्र गाफील आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.

उल्हासनगरमध्ये गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ परिसरातील कैलाश कॉलनी चौकात गुरुवारी रात्री जुन्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाजप नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. जरांगेंच्या आवाहनानंतर प्रसाद लाड आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीत येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT