Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : अशोक खरातच्या साथीदाराकडून 13.50 कोटी जप्त, ईडीची कारवाई

Maharashtra Breaking News Today LIVE 23 May : पेट्रोल डिझेलच्य दरात तिसऱ्यांदा वाढ, ग्रामीण भागात डिझेलची टंचाई, अशोक खरातच्या साथीदाराची ईडीकडून चौकशी, यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.  

Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस यांचा वंदे भारतमधून प्रवास

शिर्डी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारतमधून प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांचा रेल्वेने शिर्डी येणे पसंत केले. आज शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चर क्लस्टरचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. 2026 ते 2029 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत शिक्षण (Rayat Shikshan Sanstha) संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत

विकी सिंग लबानांचे नगरसेवकपद रद्द

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 6 मधून निवडून आलेले नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी विकी सिंग लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले.

सात जिल्ह्यात यलो अलर्ट

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. आज कोकणासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवी आहे. सातारा, कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

सुभाष जगताप यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार

पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदापासून डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या नाराजीचा फटका पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी केली आहे.

दीपके यांची सर्व अकाऊंट हॅक

अभिजित दीपके यांनी ट्विट करत सांगितले की, माझे वैयक्तिक इंस्टाग्राम खाते हॅक झाले. ट्विटरने खाते निलंबित केले. पर्यायी (बॅकअप) खाते देखील बंद करण्यात आले.'Cockroach Janata Party' चे अधिकृत इंस्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे.या खात्याचा ॲक्सेस आता आमच्यासाठी नाही.

अशोक खरातच्या साथीदाराकडून 13.50 कोटी जप्त, ईडीची कारवाई

भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लँडरिंग प्रकरणात ईडीने खरातच्या साथीदाराकडून एकाच दिवसात तब्बल 13.50 कोटी जप्त रुपये जप्त केले आहेत. खरातच्या साथीदारांची देखील ED कडून चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT