शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले, आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. त्या पद्धतीची सूचना जर वरिष्ठांकडून मिळाली आणि मैत्रीपूर्ण लढत होणार असेल तर आम्ही देखील या निवडणुकीत उतरण्यास सज्ज आहोत. मैत्रीपूर्ण लढतील जादुई आकडा कसा मिळवायचा याची किमया यापूर्वीही शिवसेनेने करून दाखवली आहे. त्यामुळे सूचना मिळाल्यानंतर आम्ही जादुई आकडा मिळवण्यासाठी प्रयत्न करू तसेच मैत्रीपूर्ण लढू.
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना विभाग मिळाला नव्हते. दीड महिन्याच्य प्रतीक्षेनंतर त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती.
देशभरात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला शहरात वाढत्या महागाईविरोधात भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.टॉवर चौक येथील वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
पुण्यातील सिंचन भवन समोर इंदापूर दौंड बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंदोलन. कृषिमंत्री, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचे सिंचन भवन समोर आंदोलन दौंड, बारामतीला पाणी मिळते पण इंदापूरला तालुक्याला का नाही? असा आंदोलकांचा सवाल.
स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर चंद्रपूरसह विदर्भातील 60 नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. हे नगरसेवक नाॅट रिचेबल आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले, १५, १५ लाख रुपये एका मतासाठी देऊन निवडणूक होत असतील तर मला वाटतंय भविष्यात लोकशाही शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतोय.
पुणे शहर परिसरात 1 ते 22 मेदरम्यान तब्बल 123 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याचे समोर आहे. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क प्रणाली’वर याची नोंद झाली आहे. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी वाढती मैत्री, प्रेमाचं आमिष, लग्नाचं खोटं आश्वासन आणि फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार ही प्रमुख कारणं असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे मुदखेड आणि अर्धापूर भागातील अनेक केळीबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीची झाडे जमीनदोस्त झाली. आधीच डिझेलच्या कमतरतेमुळे शेतीची कामे अडचणीत आली असताना आता पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हैदराबादमध्ये वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांवर कायदेशीर लढा देणाऱ्या 63 वर्षीय ज्येष्ठ वकिलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी घराबाहेर पडताच भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्या द्रुतगती महामार्गामुळे आता हा प्रवास फक्त दीड तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. अटल सेतूपासून सुरू होणारा हा मार्ग थेट पुण्याशी जोडला जाणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी एक भीषण अपघाताची घटना घडली. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरात एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
राज्याच्या दुसऱ्या बाजूला प्री-मॉन्सून हालचालींनी वेग घेतला आहे. कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
धुळे तालुक्यातील लळिंग घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे, यात डंपर ने ट्रकला उडवले आणि त्यानंतर पाठीमागून येणारि खाजगी ट्रॅव्हल बस देखील या वाहनांना धडकल्यामुळे या विचित्र अपघातात जवळपास पाच जण मृत्युमुखी पडले आहे. पाच ते सहा जण जखमी झाले आहेत,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.