Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update: महायुतीच्या 13 घटक पक्षांची बैठक, एकसंघपण काम करण्याचा निर्धार

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यातील राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Mangesh Mahale

गजानन पाटील यांनी केली पालखी मार्गाची पाहणी

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि मुलभूत सुविधांची प्रभावी अमलबजावणी ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हलगर्जीपणा करु नका, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिल्या.

श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री क्षेत्र आळंदी येथन संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक स्वरुपात नियोजन पूर्ण केले असून, त्याकामांची कामांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाहणी पालखी मार्गावर जावून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

नवी मुंबई विमानतळ नामकरणसाठी आमदार मोरे मैदानात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

एसआयआर गणना अर्ज वितरणास सहकार्य करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाकरिता गणना अर्ज छपाई त्याचे जिल्ह्यात वितरण करण्यात येत आहे, याबाबत राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना सूचना देण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित राजकीय पक्षांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, यांच्यासह राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, बहूजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनल पिपल्स पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

खडकवासला धरणाने तळ गाठला, १० वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या १० वर्षातील खडकवासला धरणात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

Pune News:पुरंदरच्या विमानतळाच्या भूसंपादनाला मुदतवाढ

पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील एक हजार 216 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडलेल्या खिंडारानंतर आता पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत. पक्षनिष्ठा कशी आहे हे दाखवण्यासाठी 130 जुने शिवसैनिक रविवारी मातोश्रीवर जाणार आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांकडून चलो मातोश्री दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT