Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : गडचिरोलीनंतर अभिजीत दीपके यांचा आजपासून नंदुरबार जिल्ह्यातील शाळांची पाहणी करणार

Political Breaking Live Headlines Updates : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी त्रस्त झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुष्काळीभागाचा दौरा करणार आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबात आज सुनावणी यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

Gadchiroli News : गडचिरोलीनंतर अभिजीत दीपके यांचा आजपासून नंदुरबार जिल्ह्यातील शाळांची पाहणी करणार

कॉक्रोज जनता पार्टी उपहासात्मक आंदोलनाचे अध्यक्ष अभिजीत दीपके नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आश्रम शाळांच्या भेटी देणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा आणि धडगाव येथील आदिवासी आश्रम शाळांना भेट देत पाहणी करणार आहे. आदिवासी आंदोलन राहुल पावरा, सागर पावरा यांच्यासोबत अभिजित दीपके जिल्हा परिषद शाळेंची पाहणी करणार आहे.

निवडणूक आयोगात फूट

 केंद्रीत निवडणूक आयोगात फूट पडल्याची चर्चा आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतले, एसआयआर, मतदारयादी नाव वगळणे आणि पुन्हा जोडणे याबाबत देखील नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेतली गेली नाही, अशी लेखी तक्रारच केंद्रीय निवडणूक आयोगातील सूखबीर सिंग संधू, विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केली होती. या विषयी वृत्त 'इंडिय एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

१७५६ रुग्णवाहिका दाखल होणार

महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. या रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून त्या लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एकूण १७५६ रुग्णवाहिका दाखल होणार असून त्यातील २५६ रुग्णवाहिका या अँडव्हान्स लाइफ सपोर्ट उपलब्ध करून देऊ शकणार आहेत तर उर्वरित १२०० या सर्वसाधारण रुग्णवाहिका असतील.

राष्ट्रवादीचे नाशिकमधील अधिवेशन स्थगित

उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी राज्यातील दुष्काळ आणि पावसाने दिलेली ओढ या पार्श्वभूमीवर वेगळ्या निर्णय घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांशी या संदर्भात करत पक्षाचे नाशिकमध्ये होणार अधिवेशन त्यांनी स्थगित केले आहे.

विसर्जन मार्गावर स्वागतमंडप उभारण्यास पोलिसांडून बंदी

विसर्जन मार्गावर स्वागत मंडप उभारण्यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांना मंडप घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने मनाई केली आहे. एका राजकीय पक्षाकडून मंगळवारी स्वागत मंडप उभारण्याचे काम सुरू असताना महापालिकेकडून त्याला विरोध करण्यात आला त्यामुळे राजकीय नेते विरुद्ध पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे.

CM देवेंद्र फडणवीस दुष्काळीभागाच्या दौऱ्यावर, लातूर, सोलापूर, धाराशीवमध्ये घेणार आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे आजपासून लातूर, सोलापूर, धारशीवमध्ये जात दुष्काळाची पाहणी करत आढावा घेणार आहेत. मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT