Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

Political Breaking Live Headlines Updates : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा आज दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. तर, उद्धव ठाकरे हे देखील दुष्काळ पाहणी दौरा आज करणार आहेत. पुणे, मुंबईत आज दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन सुरू आहे. या सह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.

सरकारनामा ब्यूरो

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण,  उत्साह कायम

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण झाले असूनही उत्साह कायम आहे. चार प्रमुख लक्ष्मी, कुमठेकर, टिळक आणि केळकर रस्त्यांवर मिरवणुका सुरू आहेत. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांसह काही मंडळांकडून डीजे साउंड सिस्टिमचा वापर करत गणेशभक्त मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले आहे. ते लोहाकडे रवाना झाले आहेत.लोहा येथे पीक परिस्थितीची करणार पाहणी करणार आहेत. पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधणार संवाद.

पनवेल विधानसभा मतदारसंघात दुबार मतदारांचा घोळ

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेदरम्यान पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांचे पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघांच्या मतदार यादीत नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित दुबार नोंदीची निवडणूक आयोगाने चौकशी करावी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमाणे नियमित होणार, राज्य सरकारचा निर्णय

पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनींवर १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली निवासी अतिक्रमाणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वंकष धोरण ठरवून पुढील ३ महिन्यांत स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांच्या विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणूक: पहिल्याच दिवशी खासदार उदयनराजेंसह सहा अर्ज दाखल;

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठीच्या निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरभी भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणावर रोखठोक भाष्य केले.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी मुदत २६ सप्टेंबरपर्यंत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि. २६ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे, नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

राज्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेता उपमुख्मयंत्री सुनेत्रा पवार हे नांदेडमध्ये आज दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव,सोलापूरमध्ये पाहणी केली होती. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाहणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT