महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आता प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून इथले पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यासाठी गावपातळीवर तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडून शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे.
सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांसाठी वाढलेली स्पर्धा आणि मर्यादित रोजगाराच्या संधींचे चित्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीतून पुन्हा एकदा समोर आले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सुमारे ७५ रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून, बारावी ही किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या या पदांसाठी पदवीधर, डीएड, बीएड तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि दूध प्रक्रिया युनिट्सवर छापेमारी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर काही राजकीय विरोधकांनी आंबेगावमधील दूध भेसळ प्रकरणामागे दिलीप वळसे पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला. तसेच, या सर्व भेसळीचे मास्टरमाईंड वळसे पाटील असून तेच या प्रकाराचे आका असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या सर्व आरोपांनंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. ते आरोप करणाऱ्यांविरोधात १०० कोटींचा दावा ठोरणार असल्याची माहिती आहे.
‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड आणि सायरन लावलेल्या आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चार जणांनी समृद्धी महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी नाशिकहून झारखंडकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अडवला. ट्रकचालकाला बेदम मारहाण करून मध्यरात्री महामार्गावरच सोडून देत आरोपी ट्रक घेऊन पसार झालेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठीच्या निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरभी भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या अर्जांचा समावेश आहे.
बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीराव शिंदे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. चार महिन्यापूर्वी परळीतील एका हाॅटेलमध्ये त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ते बचावले होते.
"तुमच्या लाडक्या आमदाराला जसे विशेष बाब म्हणून कोट्यवधी रुपये दिले, तसेच शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून दुष्काळाची मदत द्या,” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. दुष्काळाची परिस्थिती बिकट झाली असून, सरकारने मदतीचे नाटक न करता सरसकट मदत जाहीर करून तिचे वाटप करावे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी माफी मागावी असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. संविधानक संस्थांना सतत बदनाम करणे, लोकशाही प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि जनतेत संभ्रम पसरवणे हाच या ‘इंडिया’ आघाडीचा मूळ स्वभाव आहे. आघाडीच्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बदनाम करण्याचा व त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, असं म्हणत राहुल गांधींनी माफी मागावी, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.