Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा आज रामलीला मैदानावर मोर्चा

Political Breaking Live Headlines Updates : ज्ञानेश कुमार आणि SIR प्रक्रियेविरोधात आज इंडिया आघाडीकडून रामलीला मैदानावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासह देश आणि राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

जामीनावरील पोलीस अधिकाऱ्याचा स्टेट बँकेवर दरोडा

जळगावात जामीनावरील पोलीस अधिकाऱ्याचा स्टेट बँकेवर दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या भोकर (जळगाव) शाखेवर शनिवारी सायंकाळी चारला दरोडा पडला. पाच सशस्त्र संशयितांनी बँकेत फिरून शस्त्रांचा धाक दाखवला. व्यवस्थापक आणि रोखपालाला खुर्चीत बांधले. यावेळी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून रोकड आणि बँकेत ठेवलेले सोने अशा पाच बॅगा घेऊन सायंकाळी ते पाच या वेळेत हा दरोडा टाकण्यात आला. बॅगा आणि सोने घेऊन दुचाकीवरून दरोडेखोर पसार झाले.

ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा आज रामलीला मैदानावर मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीकडून आज रामलीला मैदानावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली देखील होणार आहे. रॅलीनंतर रामलीला मैदानात मोठी सभा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT