सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दहिवडी येथील मतदान केंद्रावर तोतया निवडणूक निरीक्षक बनून आलेल्या वैशाली अक्षदा देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. २०२३ मधील निवडणूक आयोगाचे जुने ओळखपत्र गळ्यात अडकवून ती केंद्रावर वावरत असताना, संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचे बिंग फुटले. सद्यस्थितीत या नावाच्या कोणत्याही निरीक्षकाची नियुक्ती नसल्याचे स्पष्ट होताच, पोलीस हवालदार अजय झुंजार यांच्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २०४ आणि २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असलेले हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.