गोकुळ दूध संघावर महाराष्ट्र शासनाने चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे (कोल्हापूर), कृष्णात पाटील आणि ॲड. प्रशांत पाटोळे यांचा समावेश आहे. शिवाजी दिनकर आडनाईक हे बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी असून, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील बंजारा वस्तीत रात्री अचानक आग लागली. या आगीत कचरा आणि ताडाची झाडे जळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा फैसला आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते गोकुळ शिरगांव येथे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान,कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ६०० हुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष महायुतीचा होणार की समविचारी आघाडीचा होणार याचा फैसला आज होणार आहे. गोकुळमधील सत्तासंघर्ष टीपेला गेला असताना कोल्हापुरच्या सर्कीट बेंचच्या आदेशानुसार आज सकाळी 11 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.